CM Eknath Shinde On Pen Urban Bank Scam | गोरगरिबांचे पैसे त्यांना परत करा; पेण अर्बन बँक घोटाळाप्रकरणी मुख्यमंत्र्यांचे आदेश

अलिबाग : पोलीसनामा ऑनलाइन – CM Eknath Shinde On Pen Urban Bank Scam | पेण अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेत (Pen Urban Cooperative Bank) आर्थिक गैरव्यवहार झाला आहे. या आर्थिक गैरव्यवहारांमुळे लहान खातेदार आणि ठेवीदारांचे मोठे नुकसान झाले आहे. त्याबद्दल आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी बँकेला निर्देश दिले आहेत. कोणत्याही परिस्थितीत गरिबांचे पैसे परत मिळालेच पाहिजेत. यासाठी सर्व शासकीय यंत्रणांनी कालबद्ध कार्यक्रम तयार करून जप्त मालमत्तांचा लवकरात लवकर लिलाव करून पैसे वसूल करा, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले आहे. पेण अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेतील ठेवीदार आणि खातेदार संघर्ष समितीच्या मागण्यांबाबत चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी एक बैठक पार पडली. यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. (CM Eknath Shinde On Pen Urban Bank Scam)

बँकेचे अध्यक्ष आणि संचालक मंडळाच्या आर्थिक गैरव्यवहारामुळे हा प्रकार घडला आहे. या गैरव्यवहारामुळे ठेवीदारांच्या ठेवींची मुदत संपली असूनही त्या परत मिळण्याची शक्यता नव्हती. त्यामुळे या ठेवींमधून घेतलेल्या 39 मालमत्ता गृह विभागाने जप्त केल्या आहेत. महाराष्ट्र ठेवीदार हितसंरक्षण अधिनियमातील तरतुदीनुसार या मालमत्ता जप्त केल्या आहेत. त्यांचा लवकरच लिलाव करण्यात येणार आहे. या लिलावाच्या पैशातून ठेवीदारांचे पैसे दिले जाणार आहेत. ठेवीदारांच्या पैशांमधून घेतलेल्या जागा सिडकोने खरेदी करून ठेवीदारांचे पैसे परत देण्याचा एक पर्याय असून, त्या दृष्टीने या जागांचे सिडकोने मूल्यांकन करण्याचे निर्देश मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले आहेत. त्यामुळे लहान खातेदार आणि ठेवीदारांना दिलासा मिळाला आहे.

मुख्यमंत्री म्हणाले, ठेवीदारांची सुमारे 611 कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेची देणी असून,
हे सर्व गोरगरिबांचे पैसे आहेत. सिडकोने या जप्त मालमत्तेचे मूल्यांकन तातडीने करण्याची प्रक्रिया सुरू करावी,
असे आदेश मुख्यमंत्र्यांनी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी (Dr. Sanjay Mukherjee IAS)
यांना दिले. तसेच सक्तवसुली संचालनालयाने जप्त केलेल्या मालमत्तांच्या 7/12 उताऱ्यांच्या इतर हक्कामध्ये
मालमत्तेची विक्री व हस्त्तांतर करण्यात येऊ नये, असा शेरा नोंदविला आहे.
त्यामुळे मालमत्तांच्या विक्रीला अडचण येत असून, हा शेरा मागे घेण्यासाठी संपूर्ण सहकार्य केले जाईल,
असे सक्तवसुली संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

Web Title :- CM Eknath Shinde On Pen Urban Bank Scam | formulate time bound plan to return depositors money eknath shinde directive regarding pen urban bank scam

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Jayant Patil On Shinde-Fadnavis Govt | ‘जर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री स्वाभिमान गहाण ठेऊन काम करणार असतील…’; जयंत पाटलांची शिंदे-फडणवीस सरकारवर टीका

Solapur Crime | पुण्यातील भाडयाच्या घरात सुरू होती बनावट नोटांची छापाई; सोलापूर पोलिसांनी छापा टाकत जप्त केल्या नोटा

Jayant Patil On Maharashtra Govt | ‘महाराष्ट्र सरकारच्या विद्वत्तेचे कौतुक करावे तितके कमीच’ – जयंत पाटील