CM Eknath Shinde On Unseasonal Rain In Maharashtra | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे – अवकाळीमुळे शेतकऱ्यांमागे कर्ज वसुलीचा तगादा नको

मुंबई : CM Eknath Shinde On Unseasonal Rain In Maharashtra | अवकाळी पाऊस, गारपीटीमुळे शेतकऱ्यांचे झालेले नुकसान लक्षात घेता नाशिक जिल्ह्यातील अल्प कर्जदार शेतकऱ्यांकडे कर्ज वसुलीसाठी तगादा लावू नका, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले. (CM Eknath Shinde On Unseasonal Rain In Maharashtra)

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या नेतृत्वाखाली विविध शिष्टमंडळांनी आज सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतली. यावेळी आमदार राजू पाटील (MLA Raju Patil), अमित ठाकरे (Amit Thackeray), माजी आमदार बाळा नांदगावकर (Bala Nandgaonkar), नितीन सरदेसाई (Nitin Sardesai), मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव (IAS Manukumar Srivastava), सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी (Dr. Sanjay Mukherjee IAS), म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल डिग्गीकर (Anil Udhavrao Diggikar IAS) आदी यावेळी उपस्थित होते. (CM Eknath Shinde On Unseasonal Rain In Maharashtra)

यावेळी नाशिक जिल्ह्यातील जिल्हा मध्यवर्ती बॅंकेने कर्जधारक शेतकऱ्यांच्या जमिनीचे जप्ती व लिलाव काढल्याबद्दल शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने भेट घेतली होती. सध्याची परिस्थितीत लक्षात घेता अल्प कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांकडून वसुलीसाठी तगादा लावू नये असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

या बैठकीत काजू बी साठी हमी भाव जाहीर करणे, वरळी बीडीडी चाळ पुनर्विकास,
सिडको गृहनिर्माण लॉटरी सोडतधारकांच्या विविध समस्या, दादर मासळी मंडईच्या व्यापाऱ्यांच्या पुनर्वसनाबाबत
चर्चा करण्यात आली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना या मागण्यांसंदर्भात सकारात्मक निर्णय घेण्याबाबत सूचना दिल्या

Web Title :-  CM Eknath Shinde On Unseasonal Rain In Maharashtra | Chief Minister Eknath Shinde – Due to unseasonal weather, farmers should not be forced to recover loans
Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

MNS Chief Raj Thackeray | ‘कोरोना काळातही हलगर्जीपणा झाला, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होऊ शकतो’, राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं

Maharashtra Political News | ‘काहीही झालं तरी महाराष्ट्रात भूकंप होणारच’, अंबादास दानवेंचं मोठं वक्तव्य

Pune Crime News | बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपी डॉक्टरला जामीन मंजूर