MNS Chief Raj Thackeray | ‘कोरोना काळातही हलगर्जीपणा झाला, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होऊ शकतो’, राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – नुकतेच मुंबईतील खारघर परिसरात झालेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार (Maharashtra Bhushan Award) सोहळ्यानंतर 14 श्रीसदस्यांचा उष्माघाताने (Heat Stroke) मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूनंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर निष्काळजीपणाचा (Maharashtra Political News) आरोप केला जात आहे. सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा (FIR) दाखल करण्याची मागणी होत आहे. यातच मनसे प्रमुख राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी तत्कालीन उद्धव ठाकरे सरकारवर (Uddhav Thackeray Government) निशाणा साधला आहे.

 

मनसे प्रमुख राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांच्यासह मनसेच्या शिष्टमंडळाने आज सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांची भेट घेतली. बीडीडी चाळीचा पुनर्विकास, सिडकोतील घरांच्या किमती यासह इतर महत्त्वाच्या विषयांवर ठाकरे-शिंदे यांच्यात चर्चा झाली. या बैठकीनंतर राज ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला.

 

खारघर घटनेत सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली आहे. यावर राज ठाकरे म्हणाले, कोरोना काळातही सरकारकडून अनेक हलगर्जीपणाच्या घटना घडल्या आहेत. त्या घटनांमध्येही सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करता येऊ शकतो. उगाच यात राजकारण करण्याची गरज नाही. तो कार्यक्रम सकाळी नव्हता करायला पाहिजे होता. धर्माधिकारी यांचा सत्कार राजभवनात झाला असता तर बरं झालं असतं. पण, तो अपघात आहे, त्याचे राजकारण करण्याची गरज नाही, अशी स्पष्टोक्ती राज ठाकरेंनी केली.

 

मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या चर्चेसंदर्भात बोलताना राज ठाकरे म्हणाले, अवकाळी पावसासंबंधी (Unseasonal Rain) मुख्यमंत्र्यांची चर्चा झाली,
लवकरच आदेश निघेल, असे ते म्हणाले. तसेच मराठी शाळेचा (Marathi School) विषय मुख्यमंत्र्यांना माहिती नव्हता.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, सरकारकडून याबाबत कुठलाही आदेश निघाला नाही.
मुख्यमंत्री आता या विषय़ात पाहतील आणि त्यावर निकाल लावतील.
मात्र, कुठल्याही शाळेत मराठी विषय बंद होणार नाही, असे राज ठाकरे यांनी सांगितले.

 

Web Title :- MNS Chief Raj Thackeray | raj thackeraythere was laxity during corona case of culpable homicide may be filed

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

MLA Amol Mitkari | ‘ही सैतानी साम्राज्याची सुरुवात, ज्या दिवशी…’, ‘त्या’ प्रकरणावरून अमोल मिटकरींचा सरकारला इशारा

Pune Mahavitaran News | महावितरणच्या बहुउद्देशीय प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन

Rupali Chakankar | ‘…म्हणून गौतमी पाटील व उर्फी जावेदवर कोणतीही कारवाई करता येत नाही’, रुपाली चाकणकर यांनी सांगितलं कारण