CM Eknath Shinde | मुख्यमंत्र्यांनी शब्द पाळला, शरद पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकाच व्यासपीठावर (व्हिडिओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांची भेट घेतली होती. या भेटीत त्यांनी एका कार्यक्रमाचे निमंत्रण दिले होते. त्याच कार्यक्रमाला एकनाथ शिंदे शनिवारी उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी दिल्लीत अमित शाह (Amit Shah) यांच्यासोबत होणारी बैठक टाळली. यावेळी बोलताना त्यांनी शरद पवारांवर स्तुतीसुमने उधळली.

मराठा मंदिर सिनेमागृह, मुंबई सेंट्रल येथे आज मराठा मंदिर अमृत महोत्सवी (Maratha Mandir Amrit Mahotsav) कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांची उपस्थिती होती. यावेळी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, संस्था अनेक निर्माण होतात. पण सातत्याने या संस्था कार्यरत राहणे टिकवणे सोपे नसते. मराठा मंदिर ही संस्था समाजाला कही देणे लागतो या भावनेने सुरु केली होती. या संस्थेबाबत कितीही बोलले तरी ते कमीच आहे.

या कार्यक्रमासाठी पवार साहेबांनी मला निमंत्रण दिले. मी त्यांना सांगितले मी या कार्यक्रमाला येणार म्हणजे येणार. आज मी गावी होतो. पाऊस पडल्याने हेलिकॉप्टर बंद पडले. मी रस्त्याने आलो. शब्द दिला होता. या कार्यक्रमाला येणार म्हणजे येणार. महत्त्वाचे म्हणजे आज दिल्लीत गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत बैठक होती. मात्र तिथे न जाता मराठा मंदिर कार्यक्रमाला हजेरी लावली.

पवार साहेबांनी अनेक संस्था उभा केल्या. माणूस जन्माने मोठा होत नाही तर कर्माने मोठा होत असतो.
मी मुख्यमंत्री आहे माझा पक्ष वेगळा त्यांचा पक्ष वेगळा आहे. पण समाजासाठी राज्यातील विषयांसाठी फोन करतात. मार्ग काढावा म्हणून राज्याला फायदा व्हावा म्हणून ते फोनवर बोलत असतात, असेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
शिंदे पुढे म्हणाले, कोरोनामुळे कार्यक्रम झाले नाही. परंतु योगायोग असेल मी मुख्यमंत्री असताना कार्यक्रम झाला. पवार साहेबांचे मी आभार मानतो, त्यांनी आमंत्रण दिलं. ते वर्षावर आले होते. ते फोनवरही बोलले असते तरी चाललं असतं. मी सांगितलं येणार. मी दिलेला शब्द पाळला.

Web Title :  CM Eknath Shinde sharad pawar present amrit mahotsav of the maratha mandir sanstha

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा