COEP Cource Closed | सीओईपीचा रेल्वे-मेट्रो अभ्यासक्रम बंद; विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात?

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – विद्यापीठाने सुरू केलेला सीओईपीचा (कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पुणे) (COEP Cource Closed) अभ्यासक्रम बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या अभ्यासक्रमात रेल्वे आणि मेट्रो प्रशिक्षण दिले जात होते. कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे (COEP Cource Closed) या संस्थेचा गेल्या चार वर्षांपासून सुरू असलेला पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन रेल अँड मेट्रो टेक्नॉलॉजी अर्थात (पीजीडीआरएमटी) हा अभ्यासक्रम अचानक बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

 

या कोर्ससाठी अडीच लाख शुल्क भरलेले विद्यार्थी यामुळे सैरभैर झाले असून, त्यांचे शैक्षणिक वर्ष धोक्यात आले आहे. सध्या देशात सार्वजनिक वाहतूकव्यवस्था बळकट करण्याच्या दृष्टीने सरकारी रेल्वेबरोबरच खासगी भागीदारीच्या माध्यमातून मेट्रो रेल्वेचे जाळे तयार करण्याचा केंद्राचा मानस आहे. त्यामुळे रेल्वेक्षेत्रात कुशल मनुष्यबळाची मागणी वाढल्याने हा नवीन अभ्यासक्रम विकसित करण्यात आला होता. गेली चार वर्षे अनेक विद्यार्थी यातून प्रशिक्षित झाले होते. परंतु, आता कोणतेही ठोस कारण न देता हा अभ्यासक्रम बंद करण्यात आला आहे.

 

कोर्ससाठी चालू वर्षाची प्रवेशप्रक्रिया पूर्ण झाली होती. आता सीओईपी प्रशासन केवळ विद्यार्थिसंख्या पुरेशी नसल्याचे कारण देत संबंधित विद्यार्थ्यांना प्रवेश रद्द करण्यास सांगत आहे, तर विद्यार्थी मात्र अभ्यासक्रम सुरू करण्याची मागणी करत आहेत. अभ्यासक्रम सुरू न झाल्यास संबंधित विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष देशोधडीला लागणार आहे.

 

या अभ्यासक्रमातून उत्तीर्ण विद्यार्थ्यांना रेल्वेक्षेत्रात नोकरीच्या संधी असतात.
रेल्वेसाठी कुशल मनुष्यबळ उपलब्ध होते. रेल्वे आणि तंत्रज्ञानाविषयी विद्यार्थ्यांना ज्ञान मिळते.
रेल्वेच्या विविध उपक्रमांत विद्यार्थ्यांना इंटर्नशीप करता येते.

 

Web Title :- COEP Cource Closed | rail metro course of coep closed pune news

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Dhondi Champya Trailer | भरत जाधव-वैभव मांगलेची तुफान कॉमेडी असलेला ‘धोंडी चंप्या; एक प्रेम कथा’चा ट्रेलर प्रदर्शित

Nana Patekar | ‘हे फक्त नितीन गडकरीच करू शकतात’ – नाना पाटेकर

PM Narendra Modi | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी आता थेट संवाद साधा