धोकेबाज पत्नीला पतीनं केलं माफ, मात्र ‘वफादारी’साठी ठेवली ‘ही’ विचित्र अट

पोलीसनामा ऑनलाइन टीम –  एका महिलेने रिलेशनशिप पोर्टलवर आपल्या विवाहित जीवनाचे एक मोठे रहस्य उलगडले. ही महिला दोन मुलांची आई आहे आणि तिचे म्हणणे आहे की तिचा नवरा आता तिसऱ्या मुलासाठी तिच्यावर दबाव आणत, जे तिला नको आहे. यामागील कारणही तिने सांगितले आहे. या महिलेने आपली व्यथा व्यक्त करताना सांगितले की, तिने मोठी चूक केली आहे. दोन वर्षांपूर्वी तिच्या कार्यालयात असलेल्या एका सहकाऱ्याशी तिचे प्रेमसंबंध होते, ज्याचा तिला आता खेद आहे.

महिलेने लिहिले, माझा नवरा हॅरीशी माझे प्रेम कमी झाले होते. मला वाटत होते कि, माझा प्रियकर माझ्यावर खरे प्रेम करतो. त्याच्यासोबत नवीन आयुष्य जगण्याचे मी स्वप्न पाहत होते. परंतु त्याने माझी फसवणूक केली त्याचे आणखी एक महिलेशी प्रेमसंबंध होते. माझे आयुष्य उध्वस्त करण्यासाठी मी स्वतःच जबाबदार आहे. सर्वात वाईट म्हणजे माझ्या पतीला माझ्या प्रेमसंबंधांबद्दल कळले. तो पूर्णपणे कोसळला परंतु त्याने मला माफ केले. आम्ही एकमेकांना समजावून सांगितले आणि आमचं लग्न वाचवण्यात यशस्वी झालो.

त्या महिलेने पुढे लिहिले की, ‘हॅरीला आता तिसरा मुलगा हवा आहे. त्यामागील कारण म्हणजे मी त्याच्याबरोबर कायम राहील अशी त्याला खात्री पाहिजे. मी त्याला बर्‍याच वेळा आश्वासन दिले आहे की, माझे कोणाबरोबरही प्रेमसंबंध कधीही राहणार नाहीत आणि मी जे केले त्याबद्दल मला वाईट वाटते. तिची समस्या सांगताना त्या महिलेने लिहिले की, ‘मला वाटत नाही की मी तिसर्‍या मुलाला सांभाळू शकेल. मी भावनिकदृष्ट्या अजूनही खूप अशक्त आहे, परंतु हॅरी वारंवार मला तिसऱ्या मुलासाठी दबाव आणत आहे. आणि मला आता आणखी एक मूल नको आहे. मी माझ्या गरोदरपणात खूप आजारी होते आणि पुन्हा सर्व गोष्टींचा विचार करून मला भीती वाटते. अगदी मानसिकदृष्ट्या मी तिसर्‍या मुलासाठी तयार नाही. दोन मुलांनाच सांभाळणे खूप अवघड आहे.

त्या महिलेने लिहिले की, ‘नुकताच मला माझ्या जुन्या प्रियकराकडून ईमेल मिळाला ज्यात तो माझी विचारपूस करत होता. मी लगेच त्याला ब्लॉक केले, जेणेकरून हॅरीने ते पाहू नये. त्याचा मेल पाहिल्यानंतर मला पुन्हा एकदा सर्वकाही आठवले. मला पुन्हा माझ्या कृतीबद्दल पश्चात्ताप होतो, मी हॅरीला किती दुखावले आहे. मी स्वत:चा द्वेष करायला लागले की मी त्याला इतके असुरक्षित केले आहे. मला माहित आहे की मी त्याच्या विश्वासास पात्र नाही, परंतु माझ्यावर त्याचा विश्वास असणे आवश्यक आहे. आता मी कधीही त्याला कोणत्याही प्रकारचा त्रास देणार नाही.

त्या महिलेने शेवटी लिहिले, ‘जे काही झाले पण तिसरे मूल समस्या सोडवू शकत नाही. मी हॅरीला हे पटवून देण्याचा प्रयत्न करीत आहे की 2 वर्षांपूर्वी मी जशी होते ती आता नाही. मी आता त्याची कधीही फसवणूक करणार नाही. मी नेहमीच त्याच्यावर प्रेम करेन आणि त्याच्याशी निष्ठावान राहील. यासाठी, त्याने मला तिसर्‍या मुलाशी बांधण्याची गरज नाही.