Congress Candidates For Lok Sabha Election 2024 | लोकसभेसाठी काँग्रेसची दुसरी यादी जाहीर, 43 उमेदवारांमध्ये 3 माजी CM ची मुले

नवी दिल्ली : Congress Candidates For Lok Sabha Election 2024 | काँग्रेस पक्षाने आगामी लोकसभा निवडणूक २०२४ साठी आपली दुसरी यादी जाहीर केली आहे. या यादीत एकुण ४३ उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये आसाम, मध्‍य प्रदेश आणि राजस्‍थानच्या उमेदवारांचा समावेश आहे. या यादीत तीन माजी मुख्यमंत्र्याच्या मुलांना सुद्धा तिकिट दिले आहे.(Congress Candidates For Lok Sabha Election 2024)

मध्य प्रदेशच्या छिंदवाडामधून विद्यमान खासदार नकुलनाथ यांना सुद्धा काँग्रेसने पुन्हा एकदा तिकिट दिले आहे. काल नवी दिल्लीत पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या काँग्रेस निवडणूक समितीच्या बैठकीत या उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले.

या ४३ उमेदवारांपैकी १३ ओबीसी वर्गातील आहेत. तर, १० उमेदवार एससी आणि ९ उमेदवार एसटी प्रवर्गातील आहेत. काँग्रेसने आपल्या दुसऱ्या यादीत एका मुस्लिम चेहऱ्याला देखील संधी दिली आहे. ८ मार्चला अंतरराष्ट्रीय महिला दिनी काँग्रेसने आपली पहिली यादी जाहीर केली होती. यामध्ये राहुल गांधी, शशी थरूर यांच्यासह ३९ उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली होती. आज जारी केलेल्या दुसऱ्या यादीत ४३ उमेदवारांपैकी १० राजस्थानातील आहेत.

राजस्‍थानच्या चूरुमधून काँग्रेसने राहुल कस्वा यांना तिकिट दिले आहे. तर बीकानेरमधून गोविंदराम मेघवाल,
झूंझूनूमधून ब्रजेंद्र ओला, जोधपुरमधून कारण सिंह उचियारडा, जालोर-सिरोहीमधून वैभव गेहलोत, अलवरमधून
ललित यादव, टोंक-सवाईधोपुरमधून हरीश चन्द्र मीना, भरतपुरमधून संजना जाटव, चित्तोडगढमधून उदयलाल आंजना,
उदयपुरमधून ताराचंद मीना यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.

गुजरातच्या अहमदाबादमधून रोहन गुप्ता यांना तिकिट दिले आहे. मध्य प्रदेशच्या टीकमगढमधून पंकज अहिरवार,
सीधीमधून कमलेश्वर पटेल, छिंदवाडामधून नकुलनाथ, देवासमधून राजेंद्र मालवीय यांना तिकिट दिले आहे.

अशाप्रकारे आसामच्या जोरहाटमधून गौरव गोगोई यांना काँग्रेसने दुसऱ्या यादीत तिकिट दिले आहे.

तीन माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलांना संधी
काँग्रेस पक्षाने आपल्या दुसऱ्या यादीत तीन सीएम पुत्रांना संधी दिली आहे. मध्‍य प्रदेशच्या छिंदवाडामधून माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांचे पूत्र नकुलनाथ यांना तिकिट दिले आहे. राजस्‍थानचे माजी सीएम अशोक गहलोत यांचे पूत्र वैभव गहलोत यांनाही तिकीट दिले आहे. २००१ ते २०१६ पर्यत आसामचे सीएम असलेले तरुण गोगई यांचे पूत्र गौरव गोगोई यांना सुद्धा काँग्रेसने दुसऱ्या यादीत स्थान दिले आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Rural Police | पौड पोलिसांकडून गावठी हातभट्टी दारूच्या अड्डयावर मोठी कारवाई, अड्डा उध्वस्त (Video)

Pune Crime News | पुण्यात घरफोडीचे सत्र सुरुच, वानवडी परिसरात 29 लाखांचा ऐवज लंपास

Sanjay Raut On Vasant More | वसंत मोरेंना राऊतांचा सल्ला, वॉशिंग मशिनच्या दिशेने जाऊ नये, प्रकाश आंबेडकरांना म्हणाले…