Congress Leader Mohan Joshi | राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूरजी शास्त्री यांच्या जयंती निमित्त 1869 तुळस व गुलाब रोप वाटप

निसर्गाचा योग्य उपयोग व विचार करून जीवनशैली ठरवण्याचा प्रयत्न म्हणजे गांधी विचार पुढे नेणे – मा. आमदार मोहन जोशी

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Congress Leader Mohan Joshi | सोमवार, दि. २ ऑक्टोबर २०२३ रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूरजी शास्त्री यांच्या जयंती निमित्त कसबा मतदार संघातील प्रभाग क्रमांक १८ परिसरातील विविध ठिकाणी (महात्मा गांधी यांचे १८६९ हे जन्म साल असल्याने) १८६९ तुळस व गुलाब रोप वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. (Congress Leader Mohan Joshi)

सदर कार्यक्रमाचा शुभारंभ राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूरजी शास्त्री यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आला. खडकमाळ आळी, घोरपडे पेठ, मोमीनपुरा, गुरुवार पेठ, गौरी आळी , वनराज मंडळ चौक – शुक्रवार पेठ, महात्मा फुले वाडा, अश्या विविध ठिकाणी नागरिकांना रोपांचे वाटप करण्यात आले. (Congress Leader Mohan Joshi)

काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते मा. आमदार मोहनदादा जोशी व आमदार रवींद्र धंगेकर (MLA Ravindra Dhangekar) यांच्या हस्ते परिसरातील नागरिकांना रोपे वाटप करण्यात आले. या प्रसंगी मोहन जोशी यांनी नागरिकांना संदेश देताना म्हणलेले कि, मानव हा निसर्गाचा एक भाग आहे. आपल्या जीवनात झाडे हे महत्वाची भूमिका बजावतात. ते आपल्याला स्वच हवा, ताजे पाणी आणि अण्णा पुरवतात, ते हवामानाचे नियमन आणि जैवविविधतेचे संरक्षण करण्यास देखील मदत करतात. जेव्हा आपण झाडे लावतो आणि त्यांची काळजी घेतो, तेव्हा आपण आपल्या पृथ्वीची आणि भावी पिढ्यांसाठी खरा फरक करत असतो. निसर्गाचा योग्य उपयोग व विचार करून जीवनशैली ठरवण्याचा प्रयत्न म्हणजे गांधी विचार पुढे नेणे.

आमदार रवींद्र धंगेकर यांनी नागरिकांना संदेश देताना म्हणलेले कि, या महात्मा गांधी व लालबहादूरजी शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त, आपण हरित भविष्यासाठी आशेचे बीज रोवू या. निसर्गाशी सुसंगत राहण्यासाठी आणि आपल्या पुर्थ्वीची काळजी घेण्यासाठी आपण वचनबद्ध आहोत, पर्यावरणाचा सन्देश देण्यासाठी हा कार्यक्रम राबवला जात आहे. या कार्यक्रमाचे एक विशिष्ट वैशिष्ट्य म्हणजे सहभागींना रोपे भेट देण्याची प्रथा. प्रत्येक रोप आशेचे प्रतीक म्हणून काम करते, हिरवेगार भविष्य घडवण्यात व्यक्तींना त्यांच्या भूमिकेची आठवण करून देते.

सदर कार्यक्रमास ॲड.शाबीर खान, हेमंत राजभोज, सागर कांबळे, अयुब पठाण, सौ. आयेशा पठाण, उमेश काची,
सौ. भाग्यश्री काची, गणेश भंडारी, प्रा. अक्षय सोनावणे, विक्रम खन्ना, सैय्यद सईद बाबा साहेब, निखिल येलारपूरकर,
नितीन येलारपूरकर, अश्फाक शेख, आदी यांनी आपापल्या भागात कार्यक्रमाचे नियोजन केले.
कार्यक्रमाचे आयोजन सौ. भावना निलेश बोराटे व काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस, ॲड. निलेश शिरीष बोराटे यांनी केले.

या प्रसंगी सुरेश कांबळे, प्रवीण करपे, चेतन अगरवाल, गोरख पळसकर, अक्षय नवगिरे, प्रज्ञेश बोराटे, शेखर पाटील,
यश बोराटे, निखिल सणस, सतीश मरलं, योगेश शिर्के, राजू वाईकर, प्रीतम भुजबळ, सोंराज पाथरे, आनंद ढोले, आकाश शेंडगे,
सोमनाथ पवार, राजू खंडागळे, विशाल बोराटे, अतिअश झुरुंगे, निशांत नेवरेकर, कुमार घाडगे, ओंकार ससाणे, जाकीर खान,
प्रथमेश मोझे, देवांग देवळे, हर्षल वंजारी, रोहन गोरवाडे, उत्कर्षा सोनराज पाथरे, विद्या विलास रवळे, सुधा आनंद ढोले,
सुनंदा बोराटे, संगीता बोराटे, रचना बोराटे, सोनाली गाढे अनिता बोराटे, पूजा बोराटे, पल्लवी बोराटे, दिपाली बोराटे, मंदा पवार,
राणी जाधव,आदी मान्यवर पदाधिकारी कार्यक्रमास उपस्थित होते.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Jayant Patil On Prakash Ambedkar | जयंत पाटलांचा प्रकाश आंबेडकरांवर पलटवार, म्हणाले – ‘…तर पळून जाऊन लग्न करणं हाच त्यावरचा पर्याय’