Jayant Patil On Prakash Ambedkar | जयंत पाटलांचा प्रकाश आंबेडकरांवर पलटवार, म्हणाले – ‘…तर पळून जाऊन लग्न करणं हाच त्यावरचा पर्याय’

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन – Jayant Patil On Prakash Ambedkar | वंचित बहुजन आघाडीचा शिवसेनेच्या ठाकरे गटासोबत साखरपुडा झाला आहे. मात्र, लग्नाच्या मुहूर्तासाठी दोन भटजीच अडथळे आणत आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे दोन भटजी तारीख काढत नाही तोपर्यंत लग्न होत नाही, असा टोला प्रकाश आंबेडकर यांनी अकोला येथे पत्रकार परिषदेत बोलताना लगावला होता. प्रकाश आंबेडकरांच्या या टीकेवर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पलटवार केला आहे. (Jayant Patil On Prakash Ambedkar)

दोन जण लग्नाला उत्सुक असतील आणि भटजी अडथळे करत असतील तर पळून जाऊन लग्न करणं हाच त्यावरचा पर्याय आहे, असं जयंत पाटील म्हणाले. तसेच आम्हाला कुणाचंही वावडं नाही. इंडिया आघाडीमध्ये जे पक्ष सहभागी होतील त्यांचं इंडिया आघाडीतील प्रमुख नेत्यांनी स्वागत केलं आहे. फक्त एकच आहे, आत येऊन आघाडीची जी धोरणं असतील त्याला मान्यता देऊन काम करणं. महाराष्ट्रात जर सगळे एकत्र आले तर त्याचा निश्चित फायदा होईल, असा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला. (Jayant Patil On Prakash Ambedkar)

जयंत पाटील पुढे म्हणाले, प्रकाश आंबेडकर यांची भूमिका सकारात्मक असेल तर त्यांचं स्वागतच केले पाहिजे. सगळ्यांना एकत्र करणं ही आमची भूमिका आहे, कुणाला टाळणं ही आमची किंवा काँग्रेसची भूमिका असेल, असं मला वाटत नाही, अशी प्रतिक्रियाही जंयत पाटील यांनी दिली.

काय म्हणाले प्रकाश आंबेडकर?

आपल्या आणि उद्धव ठाकरेंच्या मैत्रीमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी खोडा घालत असल्याचा आरोप
वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. ठाकरे आणि आमचा साखरपुडा झाला आहे.
मात्र, लग्नाच्या मुहूर्तासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीरुपी दोन भटजीच अडथळे आणत आहेत. वेळप्रसंगी बिना लग्नाचं राहू, परंतु, दुसरं स्थळ पाहणार नाही, असे सांगत प्रकाश आंबेडकर यांनी इतर दुसऱ्या पक्षासोबत आघाडी करणार नसल्याचे स्पष्ट केलं.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

INDIA Alliance Main Bhi Gandhi Rally In Mumbai | ‘इंडिया’च्या ‘मी पण गांधी’ पदयात्रेला गालबोट,
मुंबईत कार्यकर्ते-पोलिसांत वादंग?

Pune Pimpri Chinchwad Crime News | चार सराईत गुन्हेगारांकडून 5 पिस्टल 10 काडतुसे जप्त,
पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेची कारवाई (Video)

Nanded Government Hospital | धक्कादायक! नांदेडमध्ये वेळेत औषधे न मिळाल्याने 24 तासांत 24 रुग्ण दगावले