Congress MP Rahul Gandhi | सर्व चोरांचे आडनाव मोदी कसे काय?, मानहानी केसमध्ये राहुल गांधी दोषी, सुरत कोर्टाने सुनावली दोन वर्षांची शिक्षा

सुरत : वृत्तसंस्था – काँग्रेस खासदार राहुल गांधी (Congress MP Rahul Gandhi ) यांना सूरत कोर्टानं (Surat Court) मानहानी प्रकरणात (defamation Case) दोषी ठरवलं आहे, त्यामध्ये त्यांना दोन वर्षाची शिक्षा सुनावली आहे. हा राहुल गांधी (Congress MP Rahul Gandhi) यांना मोठा झटका मानला जात आहे. मोदी आडनावावरुन (Modi Surname) त्यांनी टिप्पणी केली होती, त्यामुळे त्यांच्याविरोधात मानहानीचा खटला दाखल करण्यात आला होता. दरम्यान या प्रकरणात राहुल गांधींना जामीनही मंजूर झाला आहे.

राहुल गांधी (Congress MP Rahul Gandhi) यांनी 2019 च्या लोकसभा प्रचारावेळी मोदींवर टीका करताना सर्व चोरांचे आडनाव मोदी कसे काय असा सवाल केला होता. याविरोधात गुजरातमील मोदी समाजाने राहुल गांधींवर खटला दाखल केला होता. सुरतच्या सीजेएम कोर्टाने (CJM Court) सकाळी 11 वाजता आपला निर्णय दिला आहे.

राहुल गांधी गुरुवारी कोर्टात आले होते. त्यावेळी कोर्टाने राहुल गांधी यांना तुम्हाला यावरकाही सांगायचे आहे का
असे विचारले. त्यावेळी राहुल गांधी यांनी मी नेहमी भ्रष्टाचारविरोधात बोलतो.
मी कोणाच्या विरोधात मुद्दामहून बोललो नाही. त्यामुळे कोणाला नुकसान झालेले नाही, असे सांगितले.
सुरतच्या जिल्हा सत्र न्यायालयात (District Sessions Court of Surat) मानहानीचा दावा दाखल करण्यात आला होता.

या प्रकरणी निकाल देताना न्यायालयाने आयपीसीच्या कलम 504 नुसार मानहानीच्या आरोपाखाली दोषी ठरवले.
आयपीसीच्या कलम 504 मध्ये दोषी आढळल्यास दोन वर्षांच्या तुरुंगवासाची तरतूद आहे.
राहुल गांधी यांच्याविरोधातील मानहानीची दोन प्रकरणं होती एक कलम 499 तर दुसरे कलम 504 नुसार होते.
यात त्यांना 504 नुसार दोषी ठरवण्यात आले, ज्यात दोन वर्षाच्या शिक्षेची तरतूद आहे.

Web Title :-  Congress MP Rahul Gandhi | rahul gandhi convicted for insulting modi surname the court of surat pronounced the verdict

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

FIR On NCP Sachin Dodke | राष्ट्रवादीच्या सचिन दोडकेंविरूध्द गुन्हा दाखल; भाजप सरचिटणीसाला धमकावून कामगारांना केली मारहाण

Pune Crime News | पुण्यात दोन कारवायात 11 लाखांचे अमली पदार्थ जप्त; कॅथा इडुलिस खत, ड्रग्ज प्रथमच पकडले, दोन परदेशी नागरिकांना अटक

MNS Chief Raj Thackeray | राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर प्रशासन ‘अ‍ॅक्शन मोड’वर, अखेर ‘ते’ अनधिकृत बांधकाम हटवले

Pune Crime News | रूम भाड्याने देताय सावधान; डिपॉझिट पाठविण्याच्या बहाण्याने महिलेची फसवणूक