No Exams : परीक्षांवर कोरोनाचा मारा, CBSE च्या नंतर ICSE आणि ISC बोर्डाच्या परीक्षा स्थगित

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना व्हायरस महामारीचा धोका पहाता कौन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एग्झामिनेशन्स म्हणजे CISCE ने आयसीएसई (10वी) आणि आयएससी (12वी) च्या परीक्षा स्थगित केल्या आहेत. परीक्षेच्या नवीन तारखेवर अंतिम निर्णय जून 2021 च्या पहिल्या आठवड्यात घेतला जाईल.

CBSE ने 10वीची परीक्षा रद्द केल्यानंतर आणि 12वीची परीक्षा स्थगित केल्यानंतर आता CISCE कडून ICSE (10वी) आणि ISC (12वी) च्या बोर्ड परीक्षा स्थगित केल्या आहेत. CISCEचे मुख्य कार्यकारी आणि सचिव जी एराथून यांनी याबाबत माहिती दिली आहे.

12 वीची परीक्षा (ऑफलाइन) नंतरच्या तारखेला आयोजित केली जाईल. तर इयत्ता 10 वीच्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षा एैच्छिक आहे. 10 वीचे जे विद्यार्थी परीक्षेत सहभागी होणार नाहीत, त्यांच्या निकालासाठी CISCE एक मानदंड ठरवणार आहे.

कोरोना संकटाचा विचार करता CBSE, एमपी बोर्ड, राजस्थान बोर्ड, हिमाचल प्रदेश बोर्ड आणि महाराष्ट्र बोर्डाने सुद्धा बोर्डाच्या परीक्षा स्थगिती केल्या आहेत. उत्तर प्रदेश बोर्डाच्या परीक्षा पुढील आदेशापर्यंत स्थगित करण्यात आल्या आहेत.

यासोबतच पहिली ते 12वीपर्यंतच्या शाळा 15 मे पर्यंत बंद करण्यात आल्या आहेत. उत्तर प्रदेशात 10वी आणि 12वी बोर्डाच्या परीक्षा 8 मेपासून सुरू होणार होत्या.