Corona Restrictions in Maharashtra | आरोग्यमंत्री राजेश टोपेंचा इशारा; म्हणाले – ‘आता निर्बंधांचं पालन केलं नाही तर…’

जालना : पोलीसनामा ऑनलाइन – Corona Restrictions in Maharashtra | राज्यात कोरोनाचे (Coronavirus) रूग्ण झपाट्याने वाढताना दिसत आहे. दैनंदिन वाढणा-या कोरोनाच्या रुग्ण संख्येमुळे राज्याला चिंता लागली आहे. या पार्श्वभूमीवर काही दिवसांपुर्वी राज्य सरकारने (Maharashtra Government) राज्यात काही निर्बंध देखील लागू केले आहेत. दरम्यान दिवसेंदिवस कोरोना बाधितांच्या संख्येत पडत असलेली भर पाहता आणखी कडक निर्बंधांचा (Corona restrictions in Maharashtra) विचार सरकारकडून केला जातोय. तर, राज्य आता हळूहळू तिसऱ्या लाटेकडे वाटचाल करत असल्याचं म्हणत आता लावलेल्या निर्बंधाचे पालन करणं गरजेचं असून जे निर्बंध पाळणार नाही त्यांच्यावर गुन्हे दाखल करायला हवेत असं आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी म्हटलं आहे.

राजेश टोपे (Rajesh Tope) आज (शुक्रवारी) जालन्यात माध्यमांशी बोलत होते.
त्यावेळी बोलताना राजेश टोपे म्हणाले, ‘निर्बंध पाळले नाहीत तर निर्बध आणखी कडक करावे लागतील असा इशाराच राजेश टोपे यांनी दिला.
मास्क नसेल तर दंड करा, गर्दी टाळा असे आदेश देखील प्रशासकीय अधिकाऱ्याना दिले जातील असं टोपे यांनी म्हटलं आहे.
तसेच, कोरोना रुग्णांची संख्या वाढली तरी घाबरून जाण्याची गरज नसल्याचंही ते म्हणाले. (Corona Restrictions in Maharashtra)

पुढे राजेश टोपे म्हणाले, ‘चित्रपट, नाट्यगृह, मंदिरं याबाबत लगेचच निर्बंध लावण्याचा प्रस्ताव नसून गरज पडली तर निर्बंध लावले जातील.
पण, या ठिकाणांवर होणारी गर्दी टाळण्यासाठी पाऊले उचलण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटलं आहे.
तर, अनेक जिल्ह्यात शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्या ठिकाणी कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे त्यामूळे तो निर्णय घेण्यात आल्याचे टोपे यांनी सांगितले.
तसेच, कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर बोलताना ते म्हणाले भविष्यात रुग्णसंख्या वाढली तर निर्बंधाबाबत मुख्यमंत्री निर्णय घेतील.

Web Title :-  Corona Restrictions in Maharashtra | maharashtra health minister rajesh tope warn police case will be register if coronavirus protocol violation

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Former MLA Mohan Joshi | पुण्याला आंतरराष्ट्रीय विमानतळाची गरज ! पुरंदर विमानतळ प्रश्न समन्वयाने सुटावा – माजी आमदार मोहन जोशी

 

UPI Payments | इंटरनेटशिवाय सुद्धा करू शकता यूपीआय पेमेंट्स, जाणून घ्या काय आहे प्रोसेस

 

LIC Jeevan Labh | केवळ 233 रुपयांच्या बचतीने मुलांसाठी तयार करा 17 लाखाचा फंड, जाणून घ्या या पॉलिसीची वैशिष्ट्य