Corona Vaccination | कोरोना प्रतिबंध लशीचे दोन्ही डोस घेतलेल्यांसाठी अत्यंत मोठी बातमी, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  कोरोनाचा (Corona) प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लसीकरण (Corona Vaccination) मोहीम जोरात सुरू आहे. लशीचे दोन्ही डोस घेतल्यानंतरही कोरोना होतो असा अनेकांचा समज आहे आणि त्यामुळे लसीच्या प्रभावीपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात. पण लसीविषयीचे अनेक गैरसमज दूर करणारा अहवाल फोर्टिसने (Fortis) समोर आणला आहे. कोरोनाचा सर्वाधिक धोका असलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांवर हा अभ्यास करण्यात आला होता, ज्यात लसीची ताकद सिद्ध झाली आहे. या अभ्यासानुसार, पूर्णपणे लसीकरण (Corona Vaccination) झालेल्या 92 टक्के आरोग्य कर्मचाऱ्यांपैकी ज्यांना कोरोनाची लागण झाली. त्यांच्यात अत्यंत सौम्य लक्षणे आढळली आहेत. त्यामुळे या कर्मचाऱ्यांनी घरीच उपचार घेऊन बरे झाले आहेत. दुस-या लाटेत अनेकांनी आपला जीव गमावला असताना ही बाब समाधानकारक आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

कसा करण्यात आला अभ्यास ?

देशात कोरोनाच्या दुस-या लाटेत दररोज साडे 3 ते 4 लाख रुग्ण सापडत असताना हा अभ्यास करण्यात आला.
यात लसीकरणाचे महत्व, लसीकरणानंतर होणारा कोरोना लस (corona vaccine) घेण्याविषयीच्या मनातील शंका असे विविध हेतू लक्षात घेऊन हा अभ्यास केला होता.
या अभ्यासानुसार, लसीकरणानंतर कोरोना झालेल्या ज्या कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली, त्यापैकी केवळ 1 टक्के आरोग्य कर्मचाऱ्यांनाच तीव्र स्वरुपाची लक्षणे जाणवली.
जानेवारी ते मे यादरम्यान लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या जवळपास 16 हजार कर्मचाऱ्यांचा या अभ्यासामध्ये सहभाग होता.
देशात उपलब्ध लस कोरोनावर प्रभावी असून या विषाणूविरोधात संरक्षण देते, असा निष्कर्ष या अभ्यासातून काढण्यात आला.
लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या, पण त्यानंतरही कोरोनाची लागण झालेल्या 16 हजार आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये अत्यंत सौम्य लक्षणे आढळल्याने त्यांना आयसीयू किंवा ऑक्सिजनची गरज पडली नाही.

कुटुंबातील संसर्गाचा धोकाही टळतो

लसीकरणामुळे तीव्र स्वरुपाची लक्षणे रोखणे आणि विषाणूपासून संरक्षण देण्यासोबतच कुटुंबात एकमेकांना संसर्ग होण्याचा धोकाही कमी होत आहे.
यामुळे कोरोनाच्या प्रसारावरही लवकरच आळा बसेल असे निरीक्षण नोदवण्यात आले आहे.
पब्लिक हेल्थ इंग्लंडच्या अभ्यासानुसार, (फायजर-बायोएनटेक किंवा अ‍ॅस्ट्राझेनेका) लसीचा एक डोस संसर्ग 50 टक्क्यांनी कमी करू शकतो.
भारतात उपलब्ध लसींमुळे कोरोनाचा धोका कमी होत असल्याचे या अभ्यासात दिसून येते.
कोरोनाचा सर्वाधिक धोका असणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांवर हा अभ्यास करण्यात आला.
लसीकरणानंतर संसर्गाचा धोका कमी होतो हे अनेक संशोधनातून समोर आले आहे.
उदाहरणार्थ, लसीकरण झालेल्या व्यक्तींना संसर्गाचा धोका 95 टक्क्यांनी कमी होतो हे क्लिनिकल ट्रायल्समध्ये सिद्ध झाले होते.
त्यामुळे लसीकरण न झालेल्या एक टक्के व्यक्तींनाही कोरोना होत असेल, तर लसीकरणामुळे हा धोका 95 टक्के टाळता येतो. याचाच अर्थ संसर्गाचा दर 0.05 एवढा होतो.

लसीकरणानंतर किती दिवस संसर्गाचा धोका असतो ?

फोर्टिसच्या अहवालातील आकडेवारीनुसार, 12248 आरोग्य कर्मचा-यापैकी 7170 (58.8 टक्के) कर्मचाऱ्यांनी लसीचा पहिला डोस घेतला होता.
तर 3650 (29.8 टक्के) जणांनी दुसरा डोस घेतला होता.
या निरीक्षणावेळी 5078 आरोग्य कर्मचारी लसीकरणाविना होते.
लसीकरण सुरु झाल्यानंतर 506 आरोग्य कर्मचारी SARS-CoV-2 या विषाणूने बाधित झाले होते.
तर लसीचा पहिला डोस घेतलेल्या 7170 कर्मचाऱ्यांपैकी 184 ( 2.6 टक्के) जणांना कोरोनाची लागण झाली.
लसीकरण आणि पॉझिटिव्ह येणे यातील काळ साधारण 44 दिवसांचा होता. 3650 पैकी एकूण 72 (2 टक्के) कर्मचाऱ्यांना दुसऱ्या डोसनंतरही कोरोनाची लागण झाली.
दुसरा डोस ते कोरोनाची लागण यातील काळ हा 20 दिवसांचा होता.
लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या ज्या कर्मचाऱ्यांनी 14 दिवसांचा फॉलोअप पूर्ण केला, त्यांच्यात संसर्गाचं प्रमाण 1.6 टक्के (3000 पैकी 48 कर्मचारी) एवढ होत.

या कर्मचाऱ्यांसाठी दुसरा डोस घेण्यापासून ते संसर्ग हा काळ 29.5 दिवस एवढा होता.
तज्ञांच्या मते, एप्रिल महिन्यात केलेला हा एक प्राथमिक अभ्यास आहे, ज्यावेळी म्युटंट तयार झालेले नव्हते.
आता 70-75 टक्के आरोग्य कर्मचा-यांचे लसीकरण झाल आहे.
त्यामुळे आता विविध रुग्णालये आणि संस्थांनी अधिक अभ्यास करण्याची गरज आहे.

Web Title : Corona Vaccination | 92 percent of fully vaccinated health care workers who got covid infection had mild symptoms

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Black Fungus | मुंबईत वाढला ब्लॅक फंगसचा धोका, तीन मुलांचे काढावे लागले डोळे