Corona Vaccine : 2 ते 18 वयोगटातील मुलांवर होणार कोव्हॅक्सिन लसीची चाचणी

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन  –  कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर आता तिसरी लाट येणार आहे. हि लाट पहिल्या आणि दुसऱ्या लाटेपेक्षा अधिक तीव्र असणार असून यामध्ये लहान मुलांना संसर्ग अधिक होण्याची शक्यता वर्तवली आहे. त्या पार्श्वभूमीवर देशातील आरोग्य यंत्रणा सज्ज झाली असून कोरोनाच्या तिसऱ्या लाटेपासुन लहान मुलांना दूर ठेवण्यासाठी नागपूरमध्ये भारत बायोटेक कंपनीच्या ‘कोव्हॅक्सिन’ लसीची २ ते १८ वयोगटांतील मुलांवरील मानवी चाचणी सुरू होणार आहे. साधारण १७५ मुलांवर हि चाचणी होणार आहे. महत्त्वाचे म्हणजे सध्या लसीकरणात जी कोव्हॅक्सिनची लस वापरली जात आहे. तीच लास या चाचणीत वापरली जाणार आहे अशी माहित बालरोग तज्ज्ञ डॉ. वसंत खळतकर यांनी दिली.

कोरोना विषाणूमधील ‘म्युटेशन’ (बदल) व कोरोना प्रतिबंधक नियमाचे योग्य पद्धतीने पालन होत नसल्याने तिसरी लाट लहान मुलांसाठी धोकादायकी असल्याचची शक्यता वर्तवली आहे. त्या अनुषंगाने भारतीय औषधी महानियंत्रकने (डीसीजीआय)भारत बायोटेक कंपनीला लहान मुलांवर ‘कोव्हॅक्सिन’ लसीच्या ‘ट्रायल’साठी मंजुरी दिली. यामुळे ‘एम्स’ पाटना, फेलिक्स हॉस्पिटल नोयेडा, इन्स्टियूट आफ चाईल्ड निलोफर हॉस्पिटल हैदराबाद व नागपुरात वरिष्ठ बालरोगतज्ज्ञ डॉ. वसंत खळतकर यांना या चाचणीसाठी परवानगी दिली. भारतात एकूण ५२५ सदृढ आरोग्य असलेल्या मुलांवर ही चाचणी केली जाणार आहे.

तीन वयोगटांत चाचणी

या चाचणीसंदर्भात बोलताना डॉ. खळतकर म्हणाले कि, २ ते ६, ७ ते १२ आणि १३ ते १८ या तीन वयोगटांत कोव्हॅक्सिन लसीची ही चाचणी विभागण्यात आली आहे. समितीद्वारे निवड करण्यात आलेल्या सदृढ मुला मुलींचा या चाचणीत समावेश करण्यात येणार आहे. प्रत्येक वयोगटात जवळपास २५ मुले-मुलींचा सहभाग राहणार आहे. तत्पूर्वी चाचणीत सहभागी होणाऱ्या मुळा मुलींची आरटीपीसीआर चाचणी केली जाईल. सोबतच अ‍ॅण्टिबॉडी तपासणी केली जाईल. दोन्ही चाचण्या निगेटिव्ह आल्यावर मुलाची निवड होईल. पहिला डोस ‘०.५ एमएल’चा असेल त्यानंतर २८ दिवसांनंतर दुसरा डोस दिला जाईल. त्यापूर्वी रक्ताची चाचणी केली जाईल. यासर्वांवर लक्ष ठेवण्यासाठी डॉक्टरांचे एक पथक राहणार आहे. इथिकल समितीची मंजुरी मिळाल्यानंतर प्रत्यक्ष चाचणीला सुरुवात होईल. दरम्यान, या चाचणीसाठी लवकरच नोंदणी सुरु होणार असली तरी आतापासून काही पालक या संदर्भात विचारणा करू लागले आहेत असेही डॉ खळतकर यांनी सांगितले.