‘कोरोना’ व्हॅक्सीनच्या नावावर सुद्धा फ्रॉड, फोन करून मागत आहेत ‘आधार’ आणि OTP

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना व्हायरसविरूद्ध देशात व्हॅक्सीनेशन जोरात सुरू झाले आहे, तर दुसरीकडे सायबर गुन्हेगारांनी व्हॅक्सीनेशनच्या नावावर फसवणुकीचा नवा खेळ सुरू केल आहे. केंद्र सरकारने देशभरातील लोकांना कोविड व्हॅक्सीन ओटीपी स्कॅमपासून सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. सायबर गुन्हेगार लोकांना फोन करून कोरोना व्हॅक्सीनच्या नावावर आधार कार्डनंबर आणि ओटीपी मागत आहेत. सरकारचे म्हणणे आहे की, अशाप्रकारच्या कोणत्याही कॉलवर विश्वास ठेवू नका.

काय आहे नवीन स्कॅम
PIB FactCheck च्या अधिकृत ट्विटर हँडलने नागरिकांना याबाबत इशारा दिला आहे. यामध्ये सांगण्यात आले आहे की, काही सायबर गुन्हेगार लोकांना विेशेषता ज्येष्ठांना फोन करून ड्रग अथॉरिटी ऑफ इंडियामधून बोलत असल्याचे सांगतात. ते कोविड व्हॅक्सीन वितरणाच्या नावावर व्हेरिफिकेशनसाठी आधार कार्ड आणि एक ओटीपी मागतात. तुमच्या या माहितीचा उपयोग फसवणुकीसाठी केला जाऊ शकतो. यासाठी कुणालाही फोनवर अशाप्रकारची माहिती देऊ नका.

जर तुम्ही ओटीपीची माहिती दिली तर सायबर गुन्हेगार तुमच्या आधारशी लिंक बँक खाते रिकामे करू शकतात. सरकारनुसार, ड्रग अथॉरिटी ऑफ इंडिया नावाचा कोणताही विभाग नाही. हे पूर्णपणे बनावट आहे. मात्र, ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (डीसीजीआय) नावाची संघटना जरूर आहे, जी देशात औषधे आणि उपचार उपकरणांना परवानगी आणि लायसन्स देते.

अशाप्रकारे सुद्धा होत आहेत फ्रॉड
केवळ फोनद्वारेच नाही तर लोकांना ईमेलद्वारे सुद्धा चूना लावला जात आहे. अनेक सायबर गुन्हेगार लोकांना ईमेल पाठवून व्हॅक्सीनेशनच्या रजिस्ट्रेशनच्या नावावर एक फॉर्म भरून घेत आहेत, ज्यामध्ये पर्सनल माहिती मागितली जात आहे. केवळ क्रेंद्र सरकारच नाही, अनेक राज्यांचे सरकार आणि स्थानिक पोलीस सुद्धा लोकांना अशाप्रकारच्या फ्रॉडपासून दूर राहण्याचा सल्ला देत आहेत.