कोरोना व्हॅक्सीन घेतल्यानंतर ‘ही’ लक्षणे आहेत धोक्याचे संकेत, सरकारनं केलं सतर्क

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  ब्रिटनमध्ये एस्ट्राजेनेका-ऑक्सफर्डच्या व्हॅक्सीनने ब्लड क्लॉटच्या साईड इफेक्टचा परिणाम भारताच्या कोविशील्ड व्हॅक्सीनवर सुद्धा पडला आहे. येथे व्हॅक्सीनच्या साईड इफेक्टने लोक खुप घाबरले आहेत. अशावेळी आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने हेल्थ केयर वर्कर्स आणि व्हॅक्सीन घेणार्‍यांसाठी व्हॅक्सीनच्या साईड इफेक्टबाबत अ‍ॅडव्हायजरी जारी केली आहे, ज्यामध्ये लोकांना व्हॅक्सीनेशनच्या 20 दिवसांच्या आत थ्रॉम्बोसिस (ब्लड क्लॉट्स) ची लक्षणे ओळखण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जर काही गंभीर लक्षण दिसत असेल तर ते व्हॅक्सीन केंद्रावर जाऊन नोंदवा.

अ‍ॅडव्हायजरीमध्ये लोकांना सल्ला दिला आहे की, कोणतीही व्हॅक्सीन घेतल्यानंतर (विशेषता कोविशील्ड) जर तुम्हाला जास्त डोकेदुखी, छातीत वेदना, शरीरात सूज, उलटी नसताना पोटात वेदना, झटके किंवा श्वास घेण्यास त्रास इत्यादी गंभीर लक्षणे दिसत असल्यास ती व्हॅक्सीन सेंटरवर जाऊन आवश्य रिपोर्ट करा.

याशिवाय जर इंजेक्शन साईटच्या शिवाय शरीराच्या कोणत्याही भागावर लाल रंगाचे डाग दिसल्यास सावध व्हा. मायग्रेनची समस्या नसेल आणि उलटीसह किंवा उलटी शिवाय डोक्यात सतत वेदना होत असेतील तर व्हॅक्सीनेशन सेंटरवर जाऊन ही सर्व लक्षणे रिपोर्ट करणे आवश्यक आहे.

व्हॅक्सीन घेतल्यानंतर कमजोरी, शरीराच्या एखाद्या अवयवाने काम करणे बंद करणे, कारण नसताना सतत उलटी होणे, डोळ्यांनी धुसर दिसणे, कन्फ्यूजन-डिप्रेशन किंवा मूड स्विंग होणे सुद्धा सामान्य बाब नाही. या सर्व लक्षणांबाबत व्हॅक्सीनेशन सेंटरवरील हेल्थ केयर वर्कर्सला सांगा.

व्हॅक्सीनच्या गंभीर साईड इफेक्टवर तयार राष्ट्रीय समितीने म्हटले आहे की, भारतात ब्लड क्लॉटचे खुपच कमी प्रकारच कोविशील्डच्या व्हॅक्सीनेशनशी संबंधीत असू शकतात. सूत्रांनुसार, भारतात कोविशील्ड व्हॅक्सीनच्या प्रति 10 लाख डोसवर डीप वेन थ्रॉम्बोसिस किंवा ब्लड क्लॉट्सची केवळ 0.61 टक्के प्रकरणे दिसली आहेत.

सूत्रांनुसार, ब्रिटनच्या तुलनेत भारतात व्हॅक्सीनच्या साईड इफेक्टची प्रकरणे खुप कमी दिसत आहेत. या डेटाचे मुल्यांकन करणार्‍या सरकारद्वारे गठित समितीने हे सुद्धा म्हटले की, पश्चिमी देशांच्या तुलनेत दक्षिण आशियाई लोकांमध्ये व्हॅक्सीनेशन नंतर थ्रोम्बोसिस किंवा रक्ताच्या गुठळ्या होण्याची शक्यता कमी असू शकते.

सूत्रांनुसार, ब्लड क्लॉटची बहुतांश प्रकरणे व्हॅक्सीनेशनच्या पहिल्या आठवड्यानंतर दिसून आली आहेत. अशावेळी व्हॅक्सीन घेणार्‍या लोकांना 28 दिवसांच्या आत यास रिपोर्ट करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ब्लड क्लॉटच्या प्रकरणांशी संबंधीत डेटा सांगतो की, ब्लड क्लॉटची समस्या महिला आणि पुरूषांमध्ये समान दिसत आहे. त्यांनी हे सुद्धा सांगितले की, भारत बायोटेक द्वारे निर्मित कोव्हॅक्सीनमध्ये कोणत्याही प्रकारची ब्लड क्लॉटची समस्या अजूनपर्यंत भारतात दिसून आलेली नाही.