Coronavirus : हार्ट बीटने सुद्धा ओळखू शकता ‘कोरोना’ पॉझिटिव्ह असल्याचे संकेत, रिपोर्टमध्ये दावा

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  संपूर्ण जगात कोविड-19 ची वाढती प्रकरणे आणि ब्रिटनमध्ये कोरोनाच्या नव्या स्ट्रेनने लोकांमध्ये भिती आहे. कोरोना व्हायरसची लक्षणे आणि अनेक वैद्यकीय समस्यांबाबत अनेकांना बरीच माहिती आहे. परंतु, एका नव्या रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला आहे की, मनुष्याच्या हृदयाच्या धडधडण्यात झालेल्या बदलावरून कोरोना संक्रमित असणे किंवा नसणे याबाबत इशारा मिळतो. म्हणजे हार्ट बीटमध्ये असामान्य बदल कोरोना पॉझिटिव्ह असण्याचा संकेत असू शकतो.

हा स्टडी ’कोविड-19 सिम्पटम्स स्टडी अ‍ॅप’ द्वारे 40 लाखांपेक्षा जास्त डेटाच्या अभ्यासावर अधारित आहे. या रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला आहे की, हृदयाच्या ठोक्यांची गती संकेत देऊ शकते की, व्यक्तीला कोरोना झाला आहे किंवा नाही. अ‍ॅपच्या संशोधकांनुसार, असामान्य गती किंवा हाय हार्ट रेट कोरोना मुळे होऊ शकतो. यामध्ये मनुष्याच्या हृदयाची धडधड 100 बीट्स प्रति मिनिटच्या वर जाऊ शकते.

हार्ट बीटने कोरोना संक्रमण ओळखण्यासाठी किमान पाच मिनिटे आराम करा. यानंतर अंगठ्याच्या बाजूचे आणि मधल्या बोटाने आपला पल्स रेट तपासा. या दरम्यान मनगटाची नस किंवा मानेजवळ ’विंड पाइप’ ला हलके प्रेस करा. हार्ट बीट 30 सेकंदापर्यंत काऊंट करा आणि पुन्हा त्यास 2 ने गुणा. तुमच्या हार्ट बीटचा योग्य रेट समोर येईल.

एक्सपर्टचे म्हणणे आहे की, पल्स बीटचा एक रेग्युलर रिदम सामान्य असतो. जर तुमचा हार्ट रेट 60 से 100 बीट्स प्रति मिनिट आहे तर सर्व सामान्य आहे. परंतु हार्ट रेट 100 पेक्षा जास्त असेल तर काहीतरी समस्या असू शकते.

युनायटेड किंगडम जो कोविड-19 ची व्हॅक्सीन रोलआउट करणारा जगातील पहिला देश बनला होता, परंतु आज रूप बदलणार्‍या व्हायरसचे केंद्र बनला आहे. यामुळे संपूर्ण देशात उलथा-पालथ सुरू आहे. अशा स्थितीत सरकार आणि पब्लिक हेल्थ ऑफिशियल्स लोकांना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला देत आहेत.