कोरोनाच्या उपचारात ‘हा’ देशी उपाय आणखी वाढवतोय धोका, डॉक्टरांनी केले सावध (Video)

नवी दिल्ली : वृत्त संस्था – भारतात कोरोना व्हायरसच्या दुसर्‍या लाटेने भयंकर रूप घेतले आहे. पुन्हा एकदा कोरोना व्हायरस आणि संसर्गाबाबत अनेक उपचार सांगितले जात आहेत. असाच एक दावा केला जात आहे की, गरम पाण्याची वाफ घेतल्याने कोरोना नष्ट होतो. कोरोनाचे असंख्य रूग्ण हा उपाय करतही आहेत. परंतु वास्तवात स्टीम इन्हेलेशन किंवा वाफेने कोरोनाला रोखता येते का किंवा याचे काही साईड इफेक्ट सुद्धा होऊ शकताता का ? याबाबत ’युनिसेफ इंडिया’ने आपल्या ट्विटर हँडलवर एक व्हिडिओ अपलोड केला आहे, ज्यामध्ये एक्सपर्टद्वारे दिले गेलेले उत्तर हैराण करणारे आहे.

युनिसेफ साऊथ आशियाचे रिजनल अ‍ॅडवायझर अँड चाइल्ड हेल्थ एक्सपर्ट पॉल रटर म्हणाले…

* याचा कोणताही पुरावा नाही की स्टीमने कोविड-19 ला नष्ट करू शकता. डब्ल्यूएचओ सुद्धा हा सल्ला देत नाही.

* उलट स्टीम घेण्याचे वाईट परिणाम सुद्धा होऊ शकतात. हे सतत केल्याने घसा आणि फुफ्फुसाच्या मधील नळीतील टार्किया आणि फॅरिंक्स जळू शकतात किंवा गंभीर प्रकारे डॅमेज होऊ शकतात. यामुळे अनेक समस्या होऊ शकतात.

* गरम पाणी घशासाठी चांगले असल्याचे सांगितले जात आहे पण कोरोना व्हायरस नाकाच्या पॅरानसल सायनस मध्ये 3-4 दिवसांपर्यंत राहतो आणि गरम पाणी तिथपर्यंत पोहचत नाही. यानंतर व्हायरस फुफ्फुसात दाखल होतो आणि श्वास घेण्यास त्रास होतो. परंतु, 40 डिग्री सेल्सियसवर गरम पाण्याच्या स्टीमने यास नष्ट करता येऊशकते यासाठी गरम पाण्यापेक्षा स्टीम घेणे जास्त योग्य असल्याचे म्हटले जाते.

* स्टीम फुफ्फुसाच्या आतील लेयर्स सुद्धा खराब करू शकते.

मनिपाल हॉस्पिटल्समधील पल्मोनोलॉजीेचे एचओडी डॉ. सत्यनारायण मैसूर म्हणतात…

* लागोपाठ एक आठवड्यापर्यंत स्टीम इन्हेलेशनचा सल्ला अतिशय अनसायंटिफिक आहे. त्यांनी असे रूग्ण पाहिले जे स्टीम इन्हेलेशनमुळे जास्त अडचणीत आले होते. स्टीम इन्हेलेशन गळा ते फुफ्फुसादरम्यान जो वायुमार्ग आहे तो जळू शकतो, जे कोविडपेक्षा धोकादायक आहे.

सेंट जॉन मेडिकल कॉलेज हॉस्पिटल्सचे एचओडी आणि प्रोफेसर डॉ. थॉमस मॅथ्यू यांनी सांगितले…..

* काही लोक स्टीम घेताना पाण्यात विविध प्रकारची तेल, युकालिप्टस ऑईल आणि वेदनांमध्ये दिलासा देणार्‍या बामचा वापर करतात. असे करणे धोकादायक आहे. हे मेंदूसाठी हानिकारक आहे.

* सध्या कोणताही शास्त्रीय आधार नसलेले उपाय केले जात आहेत. जर व्हायरसला स्टीम इन्हेलेशनने नष्ट करता आले असते तर जगभरात इतके मृत्यू झाले नसते. सध्या मास्क, सोशल डिस्टन्सिंग आणि सॅनिटायजेशनच लढाईतील प्रमुख शस्त्र आहे. अफवांवर विश्वास ठेवू नका.