मलायका अरोरानं फोटो शेअर करत सांगितलं ‘कोरोना’मुळं कसा बदलला ‘लुक’ !

पोलीसनामा ऑनलाइन टीम – बॉलिवूड स्टार मलायका अरोरा आपल्या हॉट फोटोंमुळं आणि योगामुळं नेहमीच चर्चेत असते. सोशलवर सक्रिय असणारी मलायका नेहमीच आपले बोल्ड फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते. यावेळी मलायकानं एक मीम सोशल मीडियावर शेअर केलं आहे. याच थेट कनेक्शन कोरोना व्हायरससोबत आहे असं दिसत आहे. मलायकाचा हा फोटो सोशलवर प्रचंड व्हायरल होत आहे.

मलायकानं एअरपोर्ट फॅशनला घेऊन गंमत केली आहे. तिनं 2019 ते 2020 पर्यंतच्या ड्रेसिंग स्टाईलचं एक मीम शेअर केलं आहे. फोटोत स्पष्ट दिसत आहे की, लोक कोरोनाच्या भीतीनं कशाप्रकारे स्टायलिशि आउटफिट ऐवजी पूर्ण बॉडी कवर करत आहेत जेणेकरून ते जीवघेण्या कोरोना व्हायरसपासून स्वत:ला वाचवू शकतील. मलायकाच्या या फोटोवरून स्पष्ट दिसत आहे की स्टार्सही आता अलर्ट झाले आहेत.

बॉलिवूड स्टार आणि फिटनेस फ्रिक मलायका अरोरा आपल्या चाहत्यांना योगाच्या प्रति प्रोत्साहित करण्यासाठी प्रत्येक सोमवारी एक योगासन शेअर करत असते. यावेळीही तिनं हँडस्टँड योग करतानाचा एक फोटो शेअर केला होता. आपला फोटो शेअर करताना मलायकानं हँडस्टँड योगा कसा करावा हेदेखील सांगितलं होता.

https://www.instagram.com/p/BxZwH7gnKva/

https://www.instagram.com/p/B8gx7oFgC7t/

https://www.instagram.com/p/B8OtaTEJXZa/

https://www.instagram.com/p/By-PH0VpKWD/