Corona : कोरोनातून बरे झाल्यानंतर आवश्य करा ‘या’ 8 टेस्ट, दुर्लक्ष करणे पडू शकते महागात, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  कोरोना व्हायरसच्या दुसर्‍या लाटेमुळे संपूर्ण देशात भीतीचे वातावरण आहे. अनियंत्रित होत चाललेल्या स्थितीदरम्यान डॉक्टर्सचे हे सुद्धा म्हणणे आहे की, रिकव्हर झालेल्या रूग्णांनी शक्य तेवढ्या लवकर व्हॅक्सीन घ्यावी. सोबतच आपल्या आरोग्याची सुद्धा काळजी घेत राहावे. आरोग्याकडे लक्ष ठेवावे. रिकव्हर झाल्यानंतर सुद्धा रूग्णांना ’पोस्ट रिकव्हरी टेस्ट’ करण्याचा सल्ला दिला जात आहे.

का आवश्यक आहे पोस्ट कोविड टेस्ट –

सार्स-कोव्ह-2 चा वायरल लोड कमी झाल्यानंतर सुद्धा त्याचे साईड इफेक्ट शरीरात मोठ्या कालवधीपर्यंत राहतात. हा व्हायरस प्रमुख अवयवांचे नुकसान करतो, इम्यून सिस्टम बाधित करतो. हे नुकसान जाणून घेण्यासाठी ही टेस्ट आवश्यक आहे.

igG अँटीबॉडी टेस्ट –

इन्फेक्शनशी लढाईनंतर शरीर अशी अँटीबॉडीज प्रोड्यूस करते जी भविष्यात इन्फेक्शनपासून वाचवण्याचे काम करते. अँटीबॉडी लेव्हल समजल्यानंतर हे कळू शकते की, इम्यून किती बचाव करत आहे, तसेच प्लाझ्मा डोनेट करण्यासाठी उपयोगी ठरू शकते.

कधी करावी टेस्ट –

सामान्यपणे अँटीबॉडीज बनवण्यासाठी शरीराला एक ते दोन आडवड्याचा वेळ लागतो. यासाठी व्यवस्थित बरे झाल्यानंतरच ही टेस्ट करा. प्लाझ्मा डोनेट करण्यासाठी रिकव्हरीनंतर एक महिन्याच्या आत ही टेस्ट करा.

सीबीसी टेस्ट –

कम्प्लीट ब्लड काऊंट (सीबीसी) टेस्ट शरीरात विविध प्रकारच्या पेशींच्या तपासणीसाठी केली जाते. यातून समजते की कोरोना संसर्गाविरूद्ध शरीर कशी प्रतिक्रिया देत आहे. कोरोनातून रिकव्हर झाल्यानंतर ही टेस्ट करावी.

ग्लूकोज, कॉलेस्ट्रोल टेस्ट –

कोरोना इंफ्लेमेशन आणि क्लॉटिंगची समस्या सुद्धा निर्माण होऊ शकते, यासाठी काही रूग्णांमध्ये ब्लड ग्लूकोज आणि ब्लड प्रेशर लेव्हलमध्ये मोठा चढ-उतार दिसून येतो. जर डायबिटीज, कॉलेस्ट्रोल किंवा कार्डिएकशी संबंधीत समस्या असेल तर रिकव्हरीनंतर याची एक रूटीन टेस्टसुद्धा करून घ्या. जास्त गंभीर लक्षणाच्या रुग्णांना क्रिएटिनिन, लिव्हर आणि किडनी फंक्शन टेस्टचा सुद्धा सल्ला दिला जातो.

न्यूरो फंक्शन टेस्ट –

काही कोरोना रुग्णांना रिकव्हरीच्या आठवड्यानंतर किंवा महिनाभरानंतर न्यूरोलॉजिकल आणि सायकॉलॉजिकल समस्या जाणवतात. ही अतिशय चिंताजनक बाब आहे, यासाठी मेडिकल एक्सपर्ट रिकव्हरीच्या एका आठवड्यानंतर ब्रेन आणि न्यूरोलॉजिकल फंक्शन टेस्ट करण्याचा सल्ला देत आहेत. कोरोनामध्ये ब्रेन फॉग, एन्जाइटी, थरथरणे आणि बेशुद्धीसारखी सुद्धा लक्षणे दिसून आली आहेत.

व्हिटॅमिन-डी टेस्ट –

विटामिन-डी एक अतिशय महत्वाचे न्यूट्रिशन आहे जे आपल्या इम्यून सिस्टमला सपोर्ट करते. अनेक स्टडीत दावा करण्यात आला आहे की, रिकव्हरीदरम्यान व्हिटॅमिन-डी सप्लीमेंटेशन खुप कमी होऊ शकते. यासाठी शरीरात व्हिटॅमिन-डीची कमतरता जाणून घेण्यासाठी ही टेस्ट आवश्यक आहे.

चेस्ट स्कॅन –

सीटी स्कॅन आणि लंग्ज फंक्शन टेस्टमध्ये रिकव्हरीबाबत चांगली माहिती मिळू शकते. रिकव्हरीच्या 3-6 महिन्यानंतर विशेष काळजी घेतली पाहिजे.

हार्ट इमेजिंग आणि कार्डिएक स्क्रीनिंग –

कोविड-19 शरीरात धोकादायक इन्फ्लेमेशनच्या समस्येला ट्रिगर करतो. अशावेळी अनेकदा हृदयाच्या मांसपेशी कमजोर पडतात. ही रिकव्हर झालेल्या रूग्णांमध्ये आढळलेल्या सर्वात सामान्य समस्यांपैकी एक आहे. यासाठी कोरोनाने गंभीर प्रकारे आजारी पडलेल्या लोकांनी एक प्रॉपर इमेजिंग स्कॅन आणि हार्ट फंक्शन टेस्ट करावी. ज्या रूग्णांच्या छातीत वेदनांची तक्रार आहे, त्यांनी डॉक्टरच्या सल्ल्याने शेड्यूल टेस्ट केली पाहिजे.