Coronavirus : जाणून घ्या, घरात कोरोना रूग्णांनी कोणती काळजी घ्यावी, लवकर कसे व्हाल रिकव्हर?

नवी दिल्ली : वृत्त संस्था – कोरोना व्हायरसच्या दुसर्‍या लाटेने देशाला पुन्हा एकदा संकटात टाकले आहे. एक्सपर्ट म्हणतात की, कोरोना व्हायरसने संक्रमित लोकांमध्ये एक तर हलकी लक्षणे दिसत आहेत किंवा ते असिम्प्टोमॅटिक आहेत. जर तुमच्या शरीरात कोरोनाचे संकेत दिसत असतील तर काही गोष्टींकडे विशेष लक्ष दिले पाहिजे, ज्याद्वारे तुम्ही तुमचा आणि इतरांचा जीव वाचवू शकता.

* ही लक्षणे ओळखा –
ताप (37 डिग्री सेल्सियसपेक्षा जास्त टेंपरेचर), सतत खोकला, तोंडाची चव आणि वास घेण्याची शक्ती नष्ट होणे, श्वास घेण्यास त्रास, थकवा, गशात खवखव आणि अंगदुखी ही कोरोनाची सामान्य लक्षणे आहेत. अशी लक्षणे दिसल्यास ताबडतोब सेल्फ आयसोलेट व्हा. कोरोनाच्या हलक्या लक्षणांना कोणत्याही विशेष उपचाराची गरज नाही. मात्र, एक ऑनलाईन टेस्ट आवश्यक बुक करा.

* सेल्फ आयसोलेशनमध्ये कसे राहावे –
घरात सुरक्षित रहा आणि जोपर्यंत मेडिकल अ‍ॅडव्हाईसची आवश्यकता नसेल तोपर्यंत कोणत्या कामासाठी बाहेर जाऊ नका. एखाद्या कोरोना संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आल्यानंतर असेच करा. आयसोलेशन पीरियड किमान 14 दिवसांचा असावा. या दरम्यान सर्व निरोगी सदस्यांपासून दूर रहा. सोशल नेटवर्कद्वारे त्यांच्याशी संपर्क साधा.

* कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी –
आयसोलेशनसाठी घरातील असे ठिकाण किंवा खोली निवडा, जिथे व्हेंटिलेशनसाठी उघड्या खिडक्या असतील. औषध, जेवण किंवा किराणा आयटम्सची डिलिव्हरीच्या वेळी लोकांसोबत फेस टू फेस संपर्क टाळा. घरातील लोकांसोबत भांडी, बिछाणा किंवा टॉवेल सारख्य वस्तू शेयर करू नका. खोकताना किंवा शिकताना तोंड रुमालाने झाका. नाक किंवा तोंडावर हात ठेवल्यास हात सॅनिटाइज करा. घरात सुद्धा मास्क घाला.

* बाथरूमचा वापर –
बाथरूमचा वापर आणि तेथील वस्तूंचा वापर केल्यानंतर त्या चांगल्या स्वच्छ करा. प्रयत्न करा की, संक्रमित व्यक्ती शेवटी वापर करेल.

* किचनचा वापर –
किचनचा वापर करताना काळजी घ्या. संक्रमित व्यक्तीला खाण्यासाठी आयसोलेशन स्पेसमध्येच द्या. त्यांनी वापरलेली भांडी गरम पाण्यात डिटर्जंटने स्वच्छ करा. किचन वापरल्यास तो सॅनिटाइज करा.

* कशी घ्याल काळजी –
जास्त पाणी प्या. धूम्रपान करू नका. अल्कोहोल करू नका.

* डॉक्टरांशी संपर्क कधी कराल –
गंभीर लक्षणे असतील तर डॉक्टरांशी सपर्क करा. कोणतेही औषध घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला आवश्यक घ्या.