Coronavirus | भारतातील अनेक राज्यात सापडला डेल्टा व्हेरिएंटशी मिळता-जुळता AY.12 स्ट्रेन, हा किती आहे धोकादायक?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  कोरोनाच्या (coronavirus) डेल्टा व्हेरिएंट (Delta Variant) ने जगभरात कहर केला आहे. आता डेल्टाच्या कुटुंबाशी संबंधीत AY.12 स्ट्रेन (Delta New Sublineage) सुद्धा भारतातील अनेक राज्यात सापडला आहे. यास अलिकडेच इस्त्रायलमध्ये (Israel) अचानक वाढलेल्या (coronavirus) प्रकरणांना जबाबदार मानले जात आहे.

व्हॅक्सीनेशननंतर सुद्धा वाढत आहे संसर्ग

INSACOG च्या साप्ताहिक अपडेटनुसार डेल्टा व्हेरिएंट यावेळी सुद्धा जगभरात लोकांना संक्रमित करत आहे. इस्त्रायलमध्ये 60 टक्के लोकसंख्येचे व्हॅक्सीनेशन झालेले असतानाही नवीन संक्रमितांची संख्या विक्रमी प्रकारे वाढत आहे. INSACOG विविध लॅबचे एक अखिल भारतीय नेटवर्क आहे जे कोविड-19 च्या जिनोम स्टडीवर लक्ष ठेवते.

डेल्टाला AY.12 मध्ये वर्गीकृत केले जाऊ शकते

असे म्हटले जात आहे की, अगोदर भारतात ज्या प्रकरणांना डेल्टा व्हेरिएंटशी संबंधीत समजले जात होते आता त्यांना AY.12 म्हणून वर्गीकृत केले जाऊ शकते. INSACOG ने आपल्या बुलेटिनमध्ये म्हटले आहे की, AY.12 स्ट्रेनची सर्व प्रकरणे समोर येण्यास वेळ लागेल कारण सध्या व्याख्या ठरलेली नाही.

डेल्टा व्हेरिएंट आणि AY.12

अजूनपर्यंत हे स्पष्ट झालेले नाही की, AY.12 डेल्टा व्हेरिएंटपेक्षा क्लिनिकली वेगळा आहे किंवा नाही. INSACOG ने म्हटले आहे डेल्टा व्हेरिएंटमधील G142D स्पाईक प्रोटीन AY.12 स्ट्रेनमध्ये नाही.

 

मिळते-जुळते म्यूटेशन नाही

या व्हेरिएंटच्या स्पाईक प्रोटीनमध्ये नोव्हेल कोरोना व्हायरस कुटुंबाशी मिळते-जुळते कोणतेही म्यूटेशन मिळालेले नाही जी मोठ्या स्तरावर लोकांसाठी धोक्याची बाब असेल.

इस्त्रायलने वाढवली जगाची चिंता

परंतु इस्त्रायलमध्ये वेगाने वाढणार्‍या प्रकरणांनी याबाबत गांभिर्याने विचार करण्यास भाग पाडले आहे. AY.12 सध्या इस्त्रायलमध्ये सर्वात जास्त प्रभावी स्ट्रेन आहे. सुमारे 51 टक्के सॅम्पलमध्ये हाच व्हेरिएंट मिळत आहे.

भारतात 1504 सॅम्पल

Outbreak.org वरून मिळालेल्या डेटानुसार, भारतात आतापर्यंत या स्ट्रेनचे 1504 सॅम्पल मिळाले आहेत. 7 सप्टेंबर 2020 ला भारतात पहिल्यांदा AY.12 चे सॅम्पल रजिस्ट केले गेले होते.

 

Web Title : Coronavirus | delta variants new sublineage ay 12 found in india how deadly it is faqs answered

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

E-Sharam Portal | खुशखबर ! 38 कोटी लोकांसाठी मोदी सरकारने लाँच केले ई-श्रम पोर्टल, जाणून घ्या काय आहे ते आणि त्याचे फायदे

Pravin Togadia | ‘भविष्यात नारायण राणे आणि उद्धव ठाकरे एकत्र येऊ शकतात’, प्रविण तोगडियांचे वक्तव्य

Anti Corruption Trap | लसीकरणासाठी 400 रुपयाची लाच घेणारा रुग्णालयातील कंत्राटी कर्मचारी अँटी करप्शनच्या जाळ्यात