Coronavirus Impact : ‘कोरोना’ ची फिल्म इंडस्ट्रीत किती ‘दहशत’ ? आतापर्यंत झाले ‘हे’ बदल (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – कोरोना व्हायरसची वाढती दहशत पाहता बॉलिवूडमधील लोकांकडूनही खबरदारी घेतली जाताना दिसत आहे. इंडस्ट्रीतील लोकांवरही कोरोनाचा मोठा परिणाम होताना दिसत आहे. इंडस्ट्रीनं कोरोनासाठी अनेक पावले उचलली आहेत जेणेकरून लोकांचं काही नुकसान होऊ नये. याचबद्दल आपण जाणून घेणार आहोत.

1) थिएटर बंद- सरकारनं कोरोनाच्या भीतीनं थिएटर बंद केले आहेत. दिल्ली, मुंबई, राजस्थान, केरळ सहित अनेक ठिकाणी थिएटर बंद करण्यात आलं आहे. गर्दी टाळण्यासाठी असं करण्यात आलं आहेच.

https://www.instagram.com/p/B9pBeYAnUk_/

2) शुटींगवर परिणाम- अनेक सिनेमांनी आणि टीव्ही मालिकांनी आपली शुटींग रद्द केली आहे. काही सिनेमांची शुटींग पोस्टपॉन केल्याचं सजमत आहे. कार्तिक आर्यनचा भूल भूलैया 2 आणि रणबीरचा ब्रह्मास्त्र या सिनेमांची शुटींग थांबवण्यात आली आहे.

https://www.instagram.com/p/B9rPowhBzdk/?utm_source=ig_embed

3) सेटवर मास्क लावताहेत स्टार – इंस्टावरून अनेक फोटो समोर येताना दिसत आहेत ज्यात अनेक कलाकार मास्क लावून फिरत आहेत. कार्तिक आर्यन, अभिषेक बच्चन, कृती खरबंदा, पूजा हेगडे अशी काही नावं सांगता येतील.

https://www.instagram.com/p/B9on7ljHFWt/

4) अनेक इव्हेंट रद्द- अनेक इव्हेंट कोरोनामुळं रद्द होत आहेत. अनेक स्टार्सनी आपले शो रद्द केले आहेत. हृतिक रोशन, सलमान खान, निक जोनास यांनीही आपले शो रद्द केले आहेत.

5) कलाकारांची घरवापसी- कोरोनाचा वाढता प्रसार पाहता कलाकार ट्रॅवलिगं टाळताना दिसत आहेत. बोनी कपूरची मुलगी खुशी कपूर नुकतीच भारतात आली आहे. विराट कोहली सारखे इतरही बाहेर गेलेले कलाकार घरी परत जाताना दिसत आहेत.