कोरोना व्हायरसमुळं होतोय पुरुषांच्या सेक्स हॉर्मोन्सवर परिणाम, जाणून घ्या कसे

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   देशात कोरोना व्हायरसच्या दुसर्‍या लाटेचा कहर सुरू आहे. मात्र, कोरोनातून बरे झालेल्या लोकांमध्ये विविध प्रकारचे दुष्परिणाम दिसून येत असल्याने चिंता वाढली आहे. आता एका नवीन स्टडीमध्ये काही आश्यर्चकारक खुलासे करण्यात आले आहेत. यामध्ये म्हटले आहे की कोरोनातून बरे झालेल्या पुरुषांसाठी धोका जास्त आहे. रिकव्हरीच्या नंतर अनेक महिन्यापर्यंत सुद्धा त्यांना संपूर्णपणे बाहेर पडत नाहीत.

नव्या स्टडीत खुलासा झाला आहे की, रिकव्हरीनंतर सुद्धा कोरोना व्हायरस पुरुषांच्या गुप्तांगात जाऊन घर करतात. ज्यामुळे पुरुषांना इरेक्टाइल डिस्फंक्शनची समस्या होत आहे, ज्यामुळे पुरुषांचे सेक्स हार्मोन टेस्टोस्टेरोनचा स्तर कमी होत असल्याचे समोर आले आहे, ज्यामुळे पुरुषांच्या कामेच्छावर वाईट परिणाम होत आहे. तसेच शुक्राणूंच्या स्तरात गडबड झाल्याने पुरुषांची रोगांशी लढण्याची क्षमता सुद्धा संपत आहे.

पुरुषांमध्ये कमी होत आहे लढण्याची क्षमता

मेर्सिन विद्यापीठात युरोलॉजीचे प्रोफेसर आणि अभ्यासाचे प्रमुख लेखक सेलाहिटिन कायन यांच्यानुसार अगोदर सांगण्यात आले आहे की, टेस्टोस्टेरोनचा स्तर कमी झाल्याने पुरुषांमध्ये रोगांशी लढण्याची क्षमता कमी होते जी सार्स-कोव्ह-2 चे कारण ठरते, परंतु हा पहिला अभ्यास आहे जो हा दावा करतो की, कोविड-19 टेस्टोस्टेरोनचा स्तर कमी करतो.

तर मियामी युनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांनी दोन पुरुष कोरोना रूग्णांच्या लिंगाचे स्कॅन केले. हे स्कॅनिंग या पुरुषांच्या रिकव्हरीच्या 6 महिन्यानंतर करण्यात आले. चाचणीत समजले की, त्यांच्या गुप्तांगाच्या आत असलेल्या इरेक्टाईल सेल्सच्या आत कोरोना व्हायरस घर करून बसला आहे. ज्यामुळे पुरुषांमध्ये इरेक्शन डिसफंक्शनची समस्या होत आहे.