कोविशील्डची निर्मिती करणार्‍या ‘सीरम’चा DCGI कडे अर्ज, म्हणाले – ‘Sputnik V लसीच्या उत्पादनासाठी परवानगी द्या’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – वाढत्या कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लसीकरण मोहीम सुरु आहे. मात्र पुरेशा लसीचा साठा उपलब्ध नसल्याने लसींची टंचाई जाणवत आहे. असे असतानाच आता कोविशील्डची निर्मिती करणा-या सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने स्पुटनिक व्ही लसीच्या उत्पादनासाठी परवानगी मागितली आहे. यासाठी सीरमने डीसीजीआयकडे अर्ज केला आहे. डीसीजीआयने DCGI सीरमला स्पुटनिक व्ही लसीची निर्मिती करण्याची परवानगी दिल्यास लसींचे उत्पादन अतिशय गतीमान होईल. जगातील सर्वात मोठी औषध उत्पादक कंपनी असा सीरमचा लौकिक आहे.

Maharashtra Unlock : राज्यात 5 टप्प्यांत अनलॉक, 18 जिल्हे पूर्णपणे Unlock; जाणून घ्या कोणत्या जिल्ह्यात काय स्थिती

सीरम सध्या पुण्यात कोविशील्ड लसींच उत्पादन करत आहे. ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि ऍस्ट्राझेनेकान यासाठीचे संशोधन केले असून निर्मितीची जबाबदारी सीरमकडे आहे. कोविशील्ड लसीच्या उत्पादनाला वेग देताना सीरमने आता स्पुटनिकच्या निर्मितीसाठीही अर्ज केला आहे. सध्या स्पुटनिक व्ही लसीच उत्पादन डॉ. रेड्डीच लॅबोरेटरीजकडून केले जात आहे. दरम्यान सीरम जून महिन्यात कोविशील्डच्या 10 कोटी डोसचं उत्पादन करणार असल्याची माहिती यापूर्वीच सरकारला दिली आहे. सीरम सध्याच्या घडीला नोवावॅक्सचीदेखील निर्मिती करत आहे. नोवावॅक्सला लवकरच अमेरिकेकडून मंजुरी मिळू शकते. रशियन लस असलेल्या स्पुटनिक व्ही लसीच्या आपत्कालीन वापरास डीसीजीआयने DCGI एप्रिलमध्ये परवानगी दिली आहे. स्पुटनिक व्ही लसीचे 30 लाख डोस काही दिवसांपूर्वीच रशियाहून हैदराबादला आले. देशात आयात झालेला हा आतापर्यंतचा सर्वात मोठा लसींचा साठा आहे.

READ ALSO THIS :

Covid-19 Vaccine : कोविड व्हॅक्सीन घेतल्यानंतर ‘ही’ 7 कामं अजिबात करू नका, ‘या’ गोष्टींची घ्या काळजी; जाणून घ्या

मुंबईत प्रियकराच्या मदतीने केली पतीची हत्या, किचनमध्ये पुरलेल्या मृतदेहाचे रहस्य 6 वर्षाच्या मुलीने सांगितले

Photos : 133 किलो होते वजन, आयपीएस अधिकाऱ्यानं 9 महिन्यात कमी केलं 43 किलो वजन, वायरल झाली छायाचित्रे