सावधान ! मुलांना जास्त प्रभावित करतेय कोरोनाची दुसरी लाट, तज्ज्ञांनी दिला ‘हा’ सल्ला, तुम्ही सुद्धा जाणून घ्या

नवी दिल्ली : कोरोना महामारीची दुसरी लाट पहिलीच्या तुलनेत मुलांना जास्त प्रभावित करत आहे. जर मुलांमध्ये कोरोनाची लक्षणे दिसून आली तर उशीर न करता दुसर्‍याच दिवशी त्यांची चाचणी केली पाहिजे. मुंबईच्या रिलायन्स आणि फोर्टिस हॉस्पीटलचे कन्सल्टंट आणि बालरोग तज्ज्ञ डॉ. सुभाष राव यांनी म्हटले की, कोरोना व्हायरसमध्ये डबल म्यूटेशन झाले आहे आणि त्याचा सध्याचा स्ट्रेन खुपच जास्त संसर्गजन्य आहे, विशेषता मुलांना जास्त प्रभावित करत आहे.

डॉ. सुभाष राव यांनी म्हटले की, दुसर्‍या लाटेत वेगळेच वळण दिसत आहे, यामध्ये मोठ्या लोकांच्या तुलनेत मुलांमध्ये सुद्धा लक्षणे दिसत आहेत. अगोदर मुले संक्रमित होत आहेत आणि त्यांच्याकडून मोठी माणसे या आजराने संक्रमित होत आहेत.

डॉ. राव यांनी म्हटले की, महामारीच्या दुसर्‍या लाटेत पहिल्या लक्षणांसह ताप येणे, थंडी लागणे, सुखा खोकला, उल्टी, अतिसार, भूक न लागणे, थकवा इत्यादी लक्षणे सुद्धा दिसत आहेत. त्यांनी म्हटले की, जर मुलांमध्ये कोरोनाची लक्षणे दिसून आली तर दुसर्‍याच दिवशी त्यांची आरटी-पीसीआर टेस्ट केली पाहिजे. ताबडतोब चाचणीनंतर उपचार सुद्धा लवकरच सुरू व्हावेत. चाचणीत टाळटाळ धोकादायक ठरू शकते, कारण यामुळे उपचाराला उशीर होऊ शकतो, संसर्गसुद्धा पसरेल.

डॉ. सुभाष राव यांचे म्हणणे आहे की, जर मुलांना दोन दिवस ताप असेल आणि नंतर बरा झाला तर त्यांना 14 दिवसांपर्यंत होम क्वारंटाइन ठेवले पाहिजे. जर ताप आल्याच्या पाचव्या दिवशी त्याची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली तर क्वारंटाइनची आवश्यकता नाही.

डॉ. राव म्हणाले, नेहमी ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की, मुले कोरोना व्हायरसची सायलेंट स्प्रेडर आहेत. जर त्यांच्याकडून मोठ्यांमध्ये हा संसर्ग पोहचला तर तो गंभीर रूप घेऊ शकतो. जर आई-वडील दोघेही संक्रमित झाले तर त्यांच्या मुलाला दुसर्‍याकडे रहायला पाठवणे आणखी धोकादायक आहे, कारण जास्त शक्यता असते की, मुल सुद्धा संक्रमित झालेले असू शकते. ते दुसर्‍याकडे गेले तर तिथे सुद्धा व्हायरस पसरण्याचा धोका राहिल.