Coronavirus Symptom : कोरोनाचं ‘हे’ लक्षण अत्यंत ‘घातक’, हॉस्पीटलमध्ये जाण्याची येऊ शकते वेळ, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  देशात कोरोनाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत वेगाने रुग्णांची संख्या वाढली आहे. कोरोनाच्या रुग्णांमध्ये नवनवीन लक्षणे आढळून येत आहेत. बहुतांश रुग्णांमध्ये आजाराची खूप सौम्य लक्षणे दिसून येतात. मात्र, वयस्कर, मधुमेह, कर्करोग आणि किडनीसंबंधीच्या आजारांनी ग्रस्त असलेल्या व्यक्तींमध्ये कोरोनाची गंभीर लक्षणे दिसून येतात. कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्या रुग्णांमध्ये 80 टक्के रुग्ण हे 65 वर्षावरील असल्याचा अंदाज आहे.

कोरोनाचा विषाणू हा मणसाच्या फुफ्फुसावर हल्ला करतो. त्यामुळे त्याच्या छातीत वेदना आणि जळजळ होते. सेंटर्स फॉर डिसीड कंट्रोल अँड प्रिव्हेंशनच्या (सीडीसी) म्हणण्यानुसार यामुळे छातीत सातत्याने वेदना आणि दाब येत असल्याचे वाटते. अशावेळी रुग्णाला रुग्णालयात दाखल करण्याची वेळ येते.

छातीत वेदना कोरोनाचे संकेत

डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, छातीत वेदना किंवा जळजळ होत असेल तर ते कोरोना संसर्गाचे लक्षण असू शकते. जर कुणाला छातीत जळजळीसह श्वास घेण्यास त्रास होत असेल तर ते कोरोनामुळे होऊ शकते. एका अध्ययनानुसार कोविड-19 च्या 17.7 टक्के रुग्णांनी छातीत वेदनेची तक्रार केली आहे. कोविड-19 च्या रुग्णांमध्ये सौम्य लक्षणांसह श्वास घेण्यास त्रास किंवा छातीत दुखण्याची तक्रार येऊ शकते. एका अभ्यासानुसार कोरोनामधून वाचणाऱ्यांपेक्षा कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांच्या छातीत तीन पट अधिक वेदना होतात.

छातीत दुखण्याची ‘ही’ आहेत कारणे

फुफ्फुसाच्या आसपास असणाऱ्या टिश्शूमध्ये इन्फ्लेमेशन किंवा हार्ट इंजरीमुळे छातीत वेदना होतात. कोरोना विषाणू एंजियोटेंसिन कन्वर्टिंग एंजाइम 2 (एसीई 2) नावाच्या रिसेप्टरच्या माध्यमातून आतील पेशींमध्ये प्रवेश करु शकतो. SE-2 शरीराच्या इतर भागामध्ये दिसून येतो. ज्यामध्ये फुफ्फुसे, हृदय आणि गॅस्ट्रोएंटसटाइनल ट्रॅक्टचा समावेश आहे. एकदा जेव्हा विषाणू SE-2 च्या माध्यमातून पेशींमध्ये प्रवेश करुन तो सेल्युलर डॅमेज आणि इन्फ्लेमेशनचे कारण ठरू शकतो.

हृदयांच्या मासपेशी कमकुवत

इम्युन सिस्टिममधून रिलीज होणारे अणू ज्यांना इन्फ्लेमेटरी सायकोटानइन स्टॉर्म सिंड्रोम म्हटले जाते. अनेकवेळा यामध्ये ह्रदयाच्या मांसपेशी कमकुवत होऊ शकतात. त्याशिवाय फुफ्फुसांचे काम योग्य पद्धतीने झाले नाही तर ऑक्सिजनची पातळी कमी होऊन हार्ट डॅमेज होऊ शकते.

फुफ्फुसातील इन्फ्लेमेशन

फुफ्फुसांमध्ये एअर बॅगच्या आवरणांदरम्यान एक फ्लुरल स्पेस असते. ती आपल्या फुफ्फुसांच्या कड्यामध्ये असेत. फ्युरल स्पेसमधून सोडले गेलेले इन्फ्लेमेटरी अणू देणाऱ्या रिसेप्टर्सला ट्रिगर करु शकतात आणि संभावित रुपामध्ये छातीमध्ये दुखणे किंवा जळजळ निर्णाण करु शकतात.

निमोनिया मुळे वेदना वाढतात

कोरोनामुळे रुग्णांना निमोनियाची समस्याही जाणवू शकते. त्यामुळे अनेकदा छातीत दुखण्याचे प्रमाण वाढते. निमोनिया फुफ्फुसांच्या एल्वियोलीचा संसर्ग असतो. एल्वियोली हवेच्या लहान पिशवीसारखी असते. या ठिकाणी ऑक्सिजन आणि कार्बन डाय ऑक्साईड एक्सचेंज होत राहतो.

खोकल्यामुळे छातीत दुखणे

अनेकवेळा गळा आणि छातीमध्ये एकाच वेळी दुखणे आणि अ‍ॅसिड रिफ्लक्स होते. यालाही कोरोनाचे लक्षण समजले जाते. एका अभ्यासानुसार, कोरोनाच्या अनेक केसमध्ये रुग्णाला पचनाशी संबंधीत समस्यांचा सामना करावा लागू शकतो. त्यामध्ये भूक न लागणे, जुलाब, मळमळ, उलटी, पोटात दुखणे, गळ्यात दुखणे किंवा कफ यासारख्या समस्यांचा सामना करावा लागतो.

पोटात किंवा छातीत जळजळ

कोरोना झाल्यामुळे काही लोकांच्या छातीत किंवा पोटात जळजळ होण्याची समस्या जाणवते. उलटी होणे, अ‍ॅसिड रिफ्लक्स आणि डायरियामुळेसुद्धा पोटात या प्रकारच्या अडचणी येऊ शकतात. मात्र, याचीही अनेक कारणे असू शकतात. ज्यामध्ये अन्नविषबाधा, अ‍ॅपेंडिक्सचे खडे, हार्टबर्न, स्ट्रेस, एन्जाइी, हृदय विकाराच झटका आणि पोटातील अल्सर यासरख्या समस्या होऊ शकतात.