COVID Vaccine : ‘ही’ 7 लक्षणं सांगतात शरीरात काम करत आहे किंवा नाही कोरोना व्हॅक्सीन; जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्त संस्था – कोरोना व्हायरसपासून बचाव करण्याचा सर्वात प्रभावी उपाय व्हॅक्सीन घेणे हा आहे. मात्र, काही लोक व्हॅक्सीनच्या संभाव्या साईड इफेक्टला घाबरतात. हेल्थ एक्सपर्टचे म्हणणे आहे की, व्हॅक्सीनच्या साईड इफेक्टला घाबरण्याची आवश्यकता नाही. कारण हे साईड इफेक्ट्स सांगतात की, व्हॅक्सीन तुमच्या शरीरात आपले काम करत आहे किंवा नाही.

अमेरिकेचे महामारी तज्ज्ञ आणि चीफ मेडिकल अ‍ॅडव्हायजर अँथॉनी फाउची यांनी अमेरिकन न्यूज चॅनल एमएसएनबीसीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, दंडावर दिलेली व्हॅक्सीन एका टप्प्याटप्प्याने प्रतिक्रिया देते. कधी-कधी दुसर्‍या डोसनंतर थोडे दुखणे जाणवते आणि थंडी लागते. याचा अर्थ असा आहे की, तुमची इम्यून सिस्टम वेगाने कामाला लागली आहे.

व्हॅक्सीन इम्यून सिस्टमला कोविड-19 स्पाईक प्रोटीनला ओळखणे आणि त्याच्या विरूद्ध अँटीबॉडी तयार करण्यास मदत करते. अँटीबॉडीमुळे खराब झाल्यानंतर हे प्रोटीन व्हायरसला वेगाने पुढ जाण्यास आणि आजार पसरवण्यास रोखते. या प्रक्रियेत काही लोकांना काही साईड इफेक्ट जाणवू शकतात.

सीडीसीनुसार व्हॅक्सीनचे सामान्य साईड इफेक्ट
1 इंजेक्शन दिलेली जागा लाल होणे
2 त्या जागेवर वेदना आणि सूज
3 थकवा जाणवणे
4 डोकेदुखी होणे
5 मांसपेशींमध्ये वेदना
6 ताप, थंडी येणे
7 मळमळल्या सारखे वाटणे

फाउची यांनी सांगितले की, दुसर्‍या डोसनंतर काही लोकांना साईड इफेक्ट होतात. कारण पहिल्या डोसनंतर इम्यून सिस्टमने व्हायरसची ओळख पटवलेली असते आणि दुसरा डोस मिळाल्यानंतर यावर वेगाने काम करते. याकारणामुळे शरीरात तापमान वाढते आणि ताप, थकवा किंवा वेदना जाणवते. काही लोकांना रॅशेज सुद्धा येतात. यावर डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध घेऊ शकता.