Cough Problem | सर्दीत औषध घेणे किती योग्य किंवा किती दिवसानंतर उपचार करावा सुरू?

Cough Problem | in cold and cough problem when to take medicine know

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Cough Problem | सर्दी होण्याची अनेक कारणे असू शकतात, ज्यामध्ये व्हायरल इन्फेक्शन सामान्य कारण आहे. पावसाळ्यामुळे किंवा हवामानातील बदलामुळे सर्दी किंवा खोकला होतो. याशिवाय शरीर आणि हवेचे तापमान बदलल्यामुळे सर्दी किंवा खोकला होतो. (Cough Problem)

सर्दी झाल्यावर काही लोक लगेचच औषध घेतात. सर्दीवर औषध घेणे कितपत योग्य आहे किंवा सर्दीवर उपचार किती दिवसांनी सुरू करावेत हा प्रश्न लोकांच्या मनात कायम असतो, याबाबत जाणून घेऊया. (Cough Problem)

सर्दी का होते

दिल्लीच्या सफदरजंग हॉस्पिटलचे डॉ. जुगल किशोर सांगतात की, नोझल सिस्टीममध्ये समस्या आल्यानंतर नाक वाहू लागते. फॅरिन्जायटिस आणि लॅरिन्जायटीसमध्ये सूज आल्याने नाक वाहणे, शिंका येणे किंवा सर्दी-संबंधित इतर समस्या उद्भवतात. ही समस्या कायम राहिल्यास त्याला सायनस असे म्हणतात.

सर्दीसाठी औषध कधी घ्यावे

साधारणपणे ते तीन ते चार दिवसांत सर्दी जाते. सर्दीसाठी औषध कधी घ्यावे? यावर डॉ जुगल सांगतात की, जर सर्दीसोबत खोकला किंवा कफ असेल तर समजा की बॅक्टेरियाचा संसर्ग झाला आहे. या स्थितीत डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करा.

सर्दीत लगेच औषध घेण्याचे तोटे

तज्ज्ञ सांगतात की सर्दीद्वारे टॉक्सिन बाहेर पडत असते. म्हणूनच लगेच औषध घेतल्याने समस्या कमी होण्याऐवजी वाढते.
सर्दी होताच अँटिबायोटिक घेतल्याने सुपरबगची स्थिती निर्माण होते.
अँटीबायोटिक्सचा शरीरावर परिणाम न होण्याच्या स्थितीला सुपरबग म्हणतात. याशिवाय,
सर्दीच्या पहिल्या दिवशी औषध घेतल्याने सूज दूर होते, परंतु इम्युन सिस्टमची प्रोसेस बिघडते. ताबडतोब औषध घेणे आणि स्वता औषध घेणे टाळा.

अशा प्रकारे सर्दीपासून व्हा मुक्त

सर्दी नैसर्गिकरित्या बरी करायची असेल तर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे विश्रांती घ्या.
याशिवाय काढा, गरम पाणी आणि घरगुती वस्तू वापरा.
दिवसातून तीन वेळा वाफ घ्या आणि शक्य तितका आराम करा.
विश्रांती न मिळाल्याने शरीरातील वेदना किंवा इतर समस्या वाढू शकतात.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

RBI Pilot Project | आरबीआय कडून कर्ज मिळणे होणार अधिक सुखकर; सुरु करणार नवीन पब्लिक टेक प्लॅटफॉर्म असणारा पायलट प्रोजेक्ट

MNS Chief Raj Thackeray | ‘जे आज खोके खोके ओरडत आहेत ना त्यांच्याकडे कंटेनर आहेत, ह्यांनी कोव्हीड पण…’ राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

New Housing Scheme | शहरामध्ये भाडेतत्त्वावर राहणाऱ्या लोकांना घेता येणार हक्काचे घर; पंतप्रधान मोदींनी केली नवीन योजना घोषित

Total
0
Shares
Related Posts