‘थर्मल गन’व्दारे ओळखा कोरोनाला, 3000 रूपयांत घरबसल्या मागवा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 29 वरुन 30 वर पोहोचली आहे. ज्यामुळे सरकार देखील सतर्क झाले आहे. विशेष करुन परदेशातून येणाऱ्या प्रवासांची स्क्रीनिंग केली जात आहे. जेणेकरुन कोरोना आणखी पसरणार नाही. बुधवारी उत्तर प्रदेशात आग्रा, नोएडामध्ये कोरोनाचे रुग्ण आढळले.

उत्तर प्रदेशात आग्रामध्ये संशयितांचा शोध सुरु आहे. ताजमहाल येथे भेट देणाऱ्या पर्यटकांची थर्मल गनने तपासणी केली जात आहे आणि तपासणीनंतरच प्रवेश दिला जात आहे. भारतात आता कोरोनाची प्रकरणे वाढत आहेत. याचा परिणाम पर्यटनावर होत आहे आणि ताजमहाल पाहण्यासाठी येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाला थर्मल गनने तपासले जात आहे.

ताजमहाल जवळ एक थर्मल गन लावण्यात आली आहे. यापूर्वी अनेक आंतरराष्ट्रीय विमानतळांवर आणि बंदरांवर थर्मल इमेजिनरी उपकरणं लावण्यात आली आहेत, जेथे प्रवाशांची तपासणी होत आहे. विमानतळ आणि बंदरांवर तज्ज्ञांच्या गटाकडून थर्मल गनने स्क्रीनिंग केले जात आहे. विशेष करुन चीन, इंग्लंड, हाॅंगकाॅंग, सिंगापूर, जपान आणि कोरियाहून देशात आलेल्या प्रवाशांची थर्मल गनने तपासणी केली जात आहे.

थर्मल गनबद्दल तज्ज्ञांच्या मते थर्मल गन स्क्रिनिंग करुन कोरोना व्हायरस किंवा इतर कोणतेही व्हायरसच्या रुग्णाची ओळख करु शकते. थर्मल स्क्रीनिंगने एक सुदृढ व्यक्ती आणि रुग्ण यातील फरक सहज लक्षात येतो.

ऑनलाइन बुक करु शकतात थर्मल गन –
ई – कॉमर्स वेबसाइटवर Thermometer Gun उपलब्ध आहे, ज्याची किंमतीची सुरुवात 3,000 पासून 50,000 रुपयांपर्यंत आहे. तुम्ही हे घर बसल्या ऑर्डर करु शकतात. परंतु सांगण्यात येत आहे की स्क्रीनिंगवेळी तज्ज्ञांचा सल्ला घेतला जावा.

काय होतो परिणाम –
याचे वैशिष्ट्य म्हणजे यातून बाहेर येणाऱ्या तरंगांचे कोणतेही साइट इफेक्ट नाहीत. थर्मल गन डोक्याजवळ घेऊन जाऊन शरीराचे तापमान मोजता येते. ज्याने सामान्य व्यक्ती आणि शरीराचे जास्त तापमान असलेल्या व्यक्तीतील फरक लक्षात येतो.

थर्मल गनने कशी होणार रुग्णाची ओळख –
हे स्कॅनर व्यक्तीच्या शरीराच्या तापमानावरुन संशयित रुग्णाला ओळखते. तज्ज्ञांच्या मते सामान्य व्यक्तीच्या तुलनेत कोरोनाग्रस्त रुग्णाचे तापमान अधिक असते. प्राथमिकता या यंत्राद्वारे संशयित रुग्णाची ओळख झाल्यानंतर त्याची वैद्यकीय तपासणी होते.

ही गन इन्फ्रारेड कॅमेऱ्याप्रमाणे काम करते. स्क्रीनिंगच्या दरम्यान व्यक्तीच्या शरीरावरुन विषाणू इन्फ्रारेड फोटोमध्ये दिसतात. डॉक्टरांच्या मते विषाणुंची संख्या अधिक किंवा धोकादायक पातळी गाठणारी असेल तर व्यक्तीच्या शरीराचे तापमान वाढत जाते.