फुरसुंगीत अपघातग्रस्तांना कोविड पोलीस मित्रांनी केली मदत

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – फुरसुंगी (भेकराई, हरपळवस्ती) येथे दुचाकीवरून पती-पत्नी जात होती. दुचाकी घसरून अपघात झाल्याने दोघांना गंभीर दुखापत झाली. यावेळी हडपसर पोलीस स्टेशन हद्दीतील विघ्नहर्ता पोलीस मित्र महेश कुदळे आणि शादाब या दोघांनी तातडीने रुग्णवाहिका बोलावून त्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी पाठविले.

मात्र, यावेळी जवळ उपस्थित असलेले नागरिक कोरोनाच्या मदतीला येत नसल्याचे दिसून आले. हडपसर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश साठे आणि पोलीस निरीक्षक हमराज कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली कोविड पोलीस मित्र कुदळे आणि शादाब यांनी अपघातग्रस्तांना मदत केल्याचे पोलीस हवालदार तानाजी देशमुख यांनी सांगितले.