CP Amitesh Kumar On Porsche Car Accident Pune | पुणे पोर्शे कार अपघात प्रकरण : आतापर्यंतच्या कारवाईची पोलीस आयुक्तांनी दिली माहिती, गाडीचा ड्रायव्हर बदलण्याचा प्रयत्न झाला, चौकशीत समोर आले

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – CP Amitesh Kumar On Porsche Car Accident Pune | पुण्यातील कल्याणीनगरमधील पोर्शे कार अपघातात रोज नवनवीन खुलासे होत आहेत (Kalyani Nagar Accident). सर्वांचेच लक्ष या प्रकरणाकडे लागले आहेत. त्यातच काल अग्रवाल कुटुंबियांमधील एका व्यक्तीने मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्याची नावे पोलीस आयुक्तालयात घेऊन पत्रकारांना अरेरावी केल्याने प्रकरण आणखी चिघळले आहे. दरम्यान, आज पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार (Amitesh Kumar IPS) यांनी पत्रकार परिषद घेऊन आतापर्यंत या प्रकरणात केलेल्या कारवाईची सविस्तर माहिती दिली.

पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले, ही घटना घडल्यानंतर पोलीस ठाण्यात ३०४ अ गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, या घटनेचे गांभीर्य पाहाता त्यानंतर ३०४ हे कलम वाढवण्यात आले. त्याच दिवशी आम्ही बाल न्याय मंडळाकडे (Juvenile Justice Board-JJB) त्या आरोपीला सज्ञान म्हणून ट्रिट करण्यात यावे, अशी मागणी केली होती. मात्र, तेव्हा आमची मागणी मान्य झाली नाही. त्यानंतर पुढच्या न्यायालयात जाण्याचा निर्णय आम्ही घेतला.(CP Amitesh Kumar On Porsche Car Accident Pune)

तसेच आरोपी मुलाच्या वडीलांवर आणि पब मालकांवरही गुन्हा दाखल करण्यात केला. त्यांना अटक करण्यात आली आहे. आरोपी मुलाची बालसुधारगृहात रवानगी करण्यासाठी आम्ही बाल न्याय मंडळाकडे मागणी केली होती, त्यानंतर आमची मागणी मान्य झाली आणि आरोपीची १४ दिवसांसाठी बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे.

आरोपीला सज्ञान म्हणून ग्राह्य धरण्यासाठी बाल न्याय मंडळाकडे प्रोसीजर सुरू आहे. आरोपीच्या वडीलांची पोलीस कोठडी आज संपत असल्यामुळे आम्ही त्यांना पुन्हा न्यायालयात हजर करणार आहोत. या सर्व प्रकरणाचा तपास संवेदनशीलपणे सुरु आहे. या प्रकरणात पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न झाला का? याचा तपास सुरु आहे.

तापस करून आम्ही लवकरात लवकर न्याय देण्याचा आणि आरोपींना शिक्षा मिळेल यासाठी प्रयत्न करत आहोत. या प्रकरणात न्यायालयात योग्य ती बाजू मांडण्यासाठी आम्ही उपाययोजना करत आहोत.

आरोपीच्या पालकाने अल्पवयीन मुलाला गाडी चालवण्यास दिली, याचाही तपास सुरू असून या प्रकरणात कारवाई करण्यास दिरंगाई झाली किंवा कोणी मॅनेज झाले असा काही आरोप होत आहे. मात्र, आम्ही यावर सांगतो की, अशा प्रकारच्या घटनांमध्ये कायद्याच्या मार्गावर पोलीस चालत आहेत. यामध्ये दिरंगाई झाली किंवा कोणी मॅनेज झाले असे म्हणणे योग्य नाही.

आता सुरुवातीला ३०४ कलम का लावण्यात आले नाही, तसेच आरोपीला पिझ्झा खाण्यासाठी दिला का? याबाबत चौकशी सुरू आहे.

या घटनेतील आरोपीचे ब्लड रिपोर्ट आले नाहीत. सुरुवातीला ब्लड सॅम्पल घेण्यात आले होते.
त्यानंतर दुसऱ्यांदा ब्लड सॅम्पल घेण्यात आले होते. फॉरेन्सिक लॅबला सांगितले आहे की दोन्ही ब्लड सॅम्पल आरोपीचे
आहेत की नाही, याची खात्री करावी.

आरोपी मद्य पित असतानाचे सीसीटीव्ही आमच्याकडे आहेत. त्या सीसीटीव्ही फुटेजद्वारे तपास सुरु आहेत.
येरवडा पोलीस ठाण्यात काय घडले याचा तपास सुरु आहे. तसेच आपल्या या कृत्यामुळे अपघात होईल,
याची जाणीव आरोपीला होती. या प्रकरणाती एका एका घटनेचा बारकाईने तपास पोलीस करत आहेत.
या घटनेत गाडीचा ड्रायव्हर बदलण्याचा प्रयत्न झाला ही बाब आमच्या चौकशीत समोर आली आहे.

पोर्श गाडीतमध्ये अपघात घडला तेव्हा एकूण चार लोक होते. त्यातील एकजण गाडी चालवत होता.
अजून दोन मुले होती आणि एक ड्रायव्हर होता. तसेच ज्या पबमध्ये पार्टी झाली, त्यावेळी आणखी सात ते आठ लोक
त्या ठिकाणी होते. यातील ड्रायव्हरचा जबाब महत्वाचा असून तो ग्राह्य धरण्यात येईल.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sindhudurga Boat Accident | उजनी पाठोपाठ सिंधुदुर्गात बोट दुर्घटना! बर्फ घेऊन जाणारी बोट उलटल्याने दोघांचा बुडून मृत्यू, 2 जण बेपत्ता?

Dombivli MIDC Blast | डोंबिवली स्फोटातील मृतांचा आकडा वाढला; मालकांविरोधात गुन्हा दाखल, एकुण जखमींची नोंद आली समोर

Porsche Car Accident Pune | पोर्शे कार अपघात : शिंदे, फडणवीस, अजित पवारांना फोन लावला तर सगळं मिटेल, अग्रवाल कुटुंबियांपैकी एकाची पोलीस आयुक्तालयातच अरेरावी (Videos)

Kothrud Pune Crime News | कोथरूडमध्ये नोकराच्या प्रसंगावधानाने फसला दरोड्याचा प्रयत्न; तीन दरोडेखोर जेरबंद (Videos)

Porsche Car Accident Pune | अल्पवयीन मुलाचा कथित व्हिडीओ व्हायरल, आई शिवानी अगरवाल यांनी समाजमाध्यमांसमोर येऊन दिले स्पष्टीकरण (Video)