CP Amitesh Kumar On Porsche Car Accident Pune | सर्वात मोठा खुलासा! पुणे पोर्शे कार केस ही ‘ड्रंक अँड ड्राईव्ह’ किंवा ‘रॅश ड्राईव्ह अँड निगलिजन्स’ची नाही, पोलीस आयुक्त म्हणाले ”ही केस…”

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – CP Amitesh Kumar On Porsche Car Accident Pune | संपूर्ण देशात गाजत असलेल्या पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणात आज सर्वात मोठा खुलासा झाला आहे. या प्रकरणाचा उल्लेख सातत्याने ड्रंक अँड ड्राईव्ह किंवा रॅश अँड निगलिजन्स असा केला जात आहे. मात्र, आज पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी म्हटले की, ही केस ड्रंक अँड ड्राईव्ह किंवा रॅश ड्राईव्ह अँड निगलिजन्सची नाही. (Kalyani Nagar Accident)

ही केस कल्पेबल होमीसाईड म्हणजे सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्याची आहे. या प्रकरणात दोन ब्लड सॅम्पल घेण्यात आले (Blood Sample Collection). तसेच दोन ब्लड सॅम्पलमधील कालावधी देखील अमितेश कुमार यांनी सांगितला. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

पोलीस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले, आमची केस भादंवि कलम ३०४ अ, ड्रंक अँड ड्राईव्ह आणि रॅश ड्राईव्ह अँड निगलिजन्स अ‍ॅक्टची नाही. एखाद्या व्यक्तीकडून दारूच्या नशेत गुन्हा घडला तर ३०४ ए आयपीसीचा गुन्हा होतो. या प्रकरणात तीन वर्षाची शिक्षा होते आणि बेलेबल ऑफेन्स असतो.(CP Amitesh Kumar On Porsche Car Accident Pune)

पण आम्ही या प्रकरणात ३०४ कलम लावले आहे. सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला गुन्ह्याची पूर्व कल्पना असल्याचे त्यात नमूद आहे. आपल्या हातून हत्या होऊ शकते हे आरोपीला माहीत होते हे त्याच्या वर्तवणुकीवरून दिसून येते, असे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले.

पोलीस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले, ज्युवेनाईल असतानाही महागडी ऑटोमॅटिक गाडी चालवणे, एका पबमध्ये
जाऊन दारू पिणे नंतर दुसऱ्या पबला जाऊन परत दारू देणे, त्यानंतर अरुंद गल्लीत गर्दी असताना,
रहदारी असताना भरधाव वेगाने गाडी चालवणे याची आरोपीला माहिती होती. त्यांच्या कृत्याने जिवीतास हानी होऊ शकते,
हे त्याला माहीत होते. त्यांचे दारु पितानाचे सीसीटीव्ही फुटेजही आमच्याकडे आहेत.

आरोपीचा ब्लड रिपोर्ट आला नाही. सुरुवातीला आरोपीचे ब्लड सॅम्पल घेण्यात आले होते. ते फॉरेन्सिकला दिले आहेत.
आम्ही ड्यु डेलिजन्स घेण्याच्या दृष्टीकोणातून आणखी ब्लड सॅम्पल घेतले होते. पहिले आणि दुसरे ब्लड सॅम्पल सेम आहे
की नाही हे पाहण्यास आम्ही फॉरेन्सिकला सांगितले आहे. आरोपीने अल्कोहोल घेतले होते की नाही याची माहिती
घेण्यासाठी पहिले ब्लड सँपल घेतले, अशी माहिती आयुक्तांनी दिली.

पोलीस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले, पहिले ब्लड सॅम्पल घेण्यात आले. त्यातील अल्कोहोलची विचारणा करण्यात
आली होती. या प्रकरणात आणखी एक ब्लड सॅम्पल घ्यावे असे वाटले, त्यात काही मॅनेज झाले तर खबरदारी म्हणून आम्ही
हे सॅम्पल घेतले.

गुन्हा ८ वाजता घडला होता. ससूनमध्ये ११ वाजता त्याचे ब्लड सॅम्पल घेतले. त्यानंतर संध्याकाळी ७ ते रात्री ८ च्या
दरम्यान दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये दुसरे ब्लड सँपल घेतले. डीएनए चाचणीसाठीचे हे सॅम्पल घेतले होते.
पण ब्लड रिपोर्ट काहीही येऊ द्या. ही केस ब्लड रिपोर्टवर अवलंबून नाही. या केसची दिशाच वेगळी आहे, आयुक्तांनी स्पष्ट केले.

पोलीस आयुक्त म्हणाले, ब्लड रिपोर्टबाबत अधिक टिप्पणी करणे योग्य नाही. पण आरोपीला गुन्ह्याची जाणीव होती.
त्याला काही कळतंच नव्हते असे नाही. आपल्या कृत्यामुळे गुन्हा घडू शकतो याची त्याला पूर्ण जाणीव होती.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Porsche Car Accident Pune | अल्पवयीन मुलाचा कथित व्हिडीओ व्हायरल, आई शिवानी अगरवाल यांनी समाजमाध्यमांसमोर येऊन दिले स्पष्टीकरण (Video)

CP Amitesh Kumar On Porsche Car Accident Pune | पुणे पोर्शे कार अपघात प्रकरण : आतापर्यंतच्या कारवाईची पोलीस आयुक्तांनी दिली माहिती, गाडीचा ड्रायव्हर बदलण्याचा प्रयत्न झाला, चौकशीत समोर आले

Porsche Car Accident Pune | पुणे पोर्शे कार अपघातात बिल्डर विशाल अग्रवाल आणि आरोपी मुलाचा नवा दावा, ”अपघात झाला तेव्हा ड्रायव्हर गाडी चालवत होता”