CPM Leader Narsayya Adam | ‘त्या’ वक्तव्यावरून नितेश राणेंना नरसय्या आडम यांनी झापलं, ”नारायण राणेंना भेटून सांगणार, मुलाला आवरा”

सोलापूर : CPM Leader Narasayya Adam | नारायण राणे (Narayan Rane) माझे चांगले मित्र आहेत. मी मुंबईला गेल्यावर नारायण राणेंना भेटून सांगतो, तुमच्या मुलाला आवरण्याचा प्रयत्न करा. मुस्लीम समाजाविरोधात इतके विष ओकणे बरे नाही, अशा शब्दात माकप नेते नरसय्या आडम (CPM Leader Narsayya Adam) यांनी नितेश राणे (Nitesh Rane) यांच्या त्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे. सोलापुरातील आशा वर्कर आंदोलनात सहभागी झाल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

नरसय्या आडम म्हणाले, मुस्लीम समाज हा देखील भारताचा नागरिक आहे. देशात हिंदू आणि मुस्लिम यांनी एकत्रित संघर्ष केल्याने भारताला स्वातंत्र्य मिळाले आहे.

आडम म्हणाले, हे जंगल राज आहे काय? देवेंद्र फडणवीस यांनी माझ्यासोबत पाच वर्षे आमदार म्हणून काम केले आहे. फडणवीसांनी कधी अशा शब्दांचा किंवा वाक्याचा उपयोग केला नाही. भाजपचे आमदार नितेश राणे बेताल वक्तव्य करत असतील तर फडणवीसांना राजीनामा द्यावा लागेल. बॉस कुणाला म्हणतात? गुंडगिरी करणाऱ्यांमध्ये बॉस असतो.

काय म्हणाले होते नितेश राणे…
माळशिरस येथील हिंदू आक्रोश मोर्चात प्रक्षोभक भाषण करताना भाजपा आमदार नितेश राणे यांनी म्हटले होते की, नितेश साहेब कार्यक्रम करून टाकला, आता पोलीस मागे लागले आहेत, वाचवा. झाल्यानंतर फोन करा. विचारायला फोन करू नका. झाल्यानंतर सुखरुप घरी पोहोचवण्याची जबाबदारी आमच्या लोकांची असेल, एवढा विश्वास तुम्हाला देतो.

पोलिसांच्या समोर देतो. माझं काही वाकडं करू शकणार नाही. आपला बॉस बसलाय सागर बंगल्यावर. काही होत नाही आम्हा लोकांना. आम्ही असंच बोलतो. कारण आम्ही हिंदू म्हणून हिंदूंच्या बरोबर उभे राहण्यासाठी आलो आहे. कुणाच्या उगाच वाकड्यात जाण्यासाठी आलेलो नाही.

या जिहाद्यांना… हे जे हिरवे वळवळताहेत ना, त्यांना सांगतो. जागेवरच रहा. जेवढे आहात तेवढेच रहा.
उगाच आमच्या अंगावर आलात, ना तर उरले सुरले कसे साफ करायचे हे देखील आमच्या धर्माने आम्हाला दाखवून दिले आहे.
जाता जाता एवढेच सांगतो की, किती हवा भरायची याला मर्यादा आहे. यानंतर हवा भरण्याची गरज पडली नाही पाहिजे.

यापुढे कुठलंही अतिक्रमण झालं, तर आपला काय नारा असला पाहिजे. त्यांचा अली आणि आपला बजरंग बली.
यापुढे हिंदू म्हणून कुणीही अधिकारी आपल्या कुणाकडे वाकड्या नजरेनं बघत असेल, तर कानाखाली १२ वाजवल्याशिवाय
गप्प बसायचं नाही. आम्ही सगळे आणि सरकार तुमच्या बरोबर आहे, असे धार्मिक तेढ निर्माण करणारे प्रक्षोभक
वक्तव्य नितेश राणे यांनी केले होते.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Police News | पुणेः पोलिस उपायुक्त आर. राजा यांच्याकडून चार पोलिस कर्मचार्‍याचं तडकाफडकी निलंबन, जाणून घ्या प्रकरण

FIR On MLA Ravindra Dhangekar | आमदार रवींद्र धंगेकर यांच्याविरुद्ध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल, जाणून घ्या कारण

Pune Police News | सहायक पोलिस आयुक्त अशोक धुमाळ यांचे निधन