Crane Crashed in Tamilnadu | तामिळनाडूमध्ये मंदिराच्या उत्सवादरम्यान क्रेन उलटून भीषण अपघात, 3 जणांचा मृत्यू

पोलीसनामा ऑनलाईन : Crane Crashed in Tamilnadu | तामिळनाडूमधील राणीपेट जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये मंडियमम्न मंदिराच्या मैलार उत्सवात एक क्रेन उलटल्यामुळे मोठी दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत तीन जणांचा मृत्यू झाला आहे. हि संपूर्ण घटना त्या ठिकाणी असलेल्या कॅमेऱ्यात कैद झाली आहे. त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या घटनेमुळे उत्सवाला गालबोट लागला असून गावामध्ये मोठी खळबळ उडाली आहे. (Crane Crashed in Tamilnadu)

काय घडले नेमके?
राणीपेट जिल्ह्यातील नेमिलीच्या किलीवेडी गावामध्ये हि दुर्घटना घडली आहे. किलीवेडी गावात मंडियमम्न मंदिर मैलार उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या उत्सवाला शेकडो भाविक आले होते. या उत्सवादरम्यान, एका क्रेनच्या मदतीने भलामोठा हार आणला होता. यावेळी क्रेनला जिथे हार लटकलेला होता, त्यावर काही तरुण उभे होते. यानंतर अचानक क्रेन डाव्या बाजूला सरकली तेव्हा तोल जाऊन क्रेन खाली कोसळली. या घटनेमुळे सगळीकडे एकच गोंधळ उडाला. (Crane Crashed in Tamilnadu)

या दुर्घटनेत क्रेनखाली दबून ज्योती बाबू या विद्यार्थिनीचा मृत्यू झाला आहे. तसेच किलावथम भूपालन आणि मजूर मुठ या मजुरांचादेखील क्रेनखाली दबून मृत्यू झाला. तसेच यामध्ये 9 जण गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारांसाठी शासकीय प्राथमिक आरोग्य केंद्र, अरक्कोनम शासकीय रुग्णालय आणि एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.

Web Title :-  Crane Crashed in Tamilnadu | crane crashed in temple fest 3 dead in near nemili arakonam tamil nadu

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

KL Rahul-Athiya Shetty Wedding | अथिया शेट्टी – के. एल. राहुलच्या संगीत सोहळ्याचा व्हिडिओ व्हायरल

Pune Crime News | मार्केटयार्डातील आंबेडकरनगरात दोन गुंडांच्या टोळ्यांचा राडा; एकमेकांवर कोयता, तलवारीने हल्ला, दोन्ही गटातील ८ जणांना अटक