Credit Card Update | आत्ता तुम्ही देखील वाचवू शकता क्रेडिट कार्डवरील इंटरेस्ट; रक्कम हस्तांतरित करण्याची नवीन सुविधा उपलब्ध

पोलीसनामा ऑनलाइन – Credit Card Update | बँकेकडून खातेधारकांना अनेक प्रकारच्या सोयी सुविधा पुरवल्या जातात. त्यापैकीच एक असलेली लोकप्रिय सुविधा म्हणजे क्रेडिट कार्ड सुविधा (Bank Credit Card). बॅंकेकडून नियमित बॅंकेचे ग्राहक असलेल्या खातेधारकांना क्रेडिट कार्ड ही सुविधा दिली जाते. सर्वात जास्त व्याज बॅंकेला या क्रेडिट कार्डमधुन वसूल करता येते. यामुळे बॅंक देखील कार्डधारकांना आकर्षक ऑफर देत असते. पण क्रेडिट कार्ड धारक म्हणून या मोहाला बळी न पडणे आणि फक्त गरजेच्या वेळीच त्याचा उपयोग करणे ही शिस्त क्रेडिट कार्ड (Credit Card Update) धारकांनी पाळणे आवश्यक आहे. क्रेडिट कार्डचे बिल न भरल्याने मोठे नुकसान तर होतेच पण सिबिल स्कोर (CIBIL Score) देखील खराब होतो.

कोणत्याही बॅंकेचे क्रेडिट कार्ड वापरताना दक्षता घेणे आणि त्या कार्डबद्दल संपूर्ण माहिती घेणे गरजेचे असते. कार्डवर बिल न भरल्यास लागणार इटरेस्ट आणि चार्जस याची माहिती असणे आवश्यक आहे. ही थकबाकी भरण्याचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. लोक देखील विविध मार्गाने बॅंकेची थकबाकी भरत असतात. बॅंकेची उर्वरित रक्कम हस्तांतरित करणे (Transferring Credit Card Balance) हा देखील एक फायदेशीर पर्याय उपलब्ध आहे. क्रेडिट कार्डची उरलेली रक्कम ही दुसऱ्याला ट्रान्सफर करणे हा उपाय क्रेडिट कार्ड धारकाचे पैसे तर वाचवतोच आणि चांगल्या वित्तीय सवयी (Financial Habits) देखील लावतो. या सवयीमुळे क्रेडिट कार्ड असूनही अतिरिक्त खर्च वाचवता येतो. पण क्रेडिट कार्डची उरलेली रक्कम ट्रान्सफर करण्याची परवानगी प्रत्येक धारकाला नसून त्यासाठी देखील काही नियम असतात.

क्रेडिट कार्डची जी काही ड्यू अमाऊंट अर्थात देय रक्कम ही दुसर्‍या जारीकर्त्याकडे हस्तांतरित केल्याने व्याजदर कमी होऊ शकते. यामुळे क्रेडिट कार्ड धारकांना त्यांची देय रक्कम भरण्यास चांगली मदत होते आणि ड्यू डेट देखील पाळली जाते. सध्याच्या क्रेडिट कार्डवरील APR जास्त असल्यास, कमी किंवा शून्य APR असलेल्या कार्डवर शिल्लक हस्तांतरित केल्याने व्याज पेमेंटवर बचत करण्यात मदत होऊ शकते. कार्डधारकांना आणखी किती व्याज द्यावे लागेल हे त्यांच्या नवीन क्रेडिट कार्ड जारीकर्त्याद्वारे ठरवले जाईल. पण ही सुविधा मिळवण्यासाठी नवीन कार्ड असणे गरजेचे आहे.

बॅंकेकडून क्रेडिट कार्ड (Credit Card Update) धारकांसाठी खास देण्यात येणाऱ्या बॅलन्स ट्रान्सफर सुविधा ही उपलब्ध
असेल असे क्रेडिट कार्ड शोधणे आणि त्यासाठी अर्ज करणे गरजेचे आहे.
हे कार्ड घेतल्यानंतर बॅलन्स ट्रान्सफर सुविधा सुरू करण्यासाठी बँकेला कळवणे देखील गरजेचे असते.
असे बॅंकेला कळवणे हे बंधनकारक असते. त्याशिवाय सुविधेचा लाभ घेता येत नाही.
बॅकेला तुमच्या सध्या कार्डची संपूर्ण तपशील आणि ट्रान्सफर करावयाची रक्कम सांगावी.
एकदा बॅलन्स ट्रान्सफर प्रक्रिया पूर्ण झाल्यावर निर्धारित वेळेत तुमची ड्यू रक्कम भरणे सुरू करा.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Mental health | Perfect बनण्याच्या अट्टाहासात लोक होत आहेत मानसिक आजारी, जाणून घ्या ब्रेन कसा ठेवावा हेल्दी!

Ear Infection Increases During Monsoon: Here’s How You Can Deal With It Naturally

24 August Rashifal : कर्क आणि कुंभ राशीवाल्यांना मिळू शकते मोठी डील फायनल करण्याची संधी, वाचा १२ राशींचे दैनिक भविष्य

How To Reduces Belly Fat | उपवास केल्याने पोटाची चरबी जलद वितळते का? वजन कमी करण्यासाठी उपाशी राहणे किती योग्य, जाणून घ्या एक्सपर्टचे मत