नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Mental health | ऑस्ट्रेलियन संशोधकांनी मानसिक आरोग्यावरील एका संशोधनात दावा केला आहे की लोक कामाचा दबाव आणि स्वताचे काम परफेक्ट करण्याच्या नादात मानसिक आरोग्य बिघडवत आहेत (Mental health).
अभ्यासानुसार, ज्या लोकांमध्ये परफेक्शनिस्ट बनण्याचा ट्रेंड असतो ते इतरांच्या तुलनेत स्वतःच्या अविश्वसनीय मानकांमुळे एंग्जायटी, डिप्रेशन यासह विविध मानसिक आजारांना बळी पडतात. तज्ज्ञांनी सांगितले की, या काळात लोकांमध्ये थकवा, भावनिक सुन्नपणा आणि घरात किंवा कामाच्या ठिकाणी गोंधळासारखी स्थिती उद्भवते. संशोधक गॉर्डन पार्कर म्हणाले, कामाचा दबाव आणि स्वतःला परफेक्शनिस्ट सिद्ध करण्याच्या प्रक्रियेत लोक स्वतःच्या मानसिक आरोग्याला हानी पोहोचवत आहेत. (Mental health)
हे संशोधन ब्लॅक डॉग इन्स्टिट्यूटच्या संशोधकांनी केले आहे. संशोधनात असे आढळले की या मानसिक आजारांची लक्षणे अधिक व्यापक आहेत. या संशोधनाची माहिती ‘बर्नआउट : अ गाईड टू आयडेंटिफायिंग बर्नआउट अँड पाथवेज टु रिकव्हरी’ या पुस्तकात देण्यात आली आहे. संशोधनानुसार, स्वतःला चांगले सिद्ध करण्याचा दबाव मानसिक आजारांचे कारण ठरत आहे.
मेंदू निरोगी कसा ठेवावा?
योग्य आहार :
मेंदूसाठी आहार महत्त्वाचा आहे. आहारात व्हिटॅमिन, मिनरल्स, अँटिऑक्सिडंट्स आणि अमीनो अॅसिड यासारख्या पोषक घटकांचा योग्य समावेश ठेवा. मसूर डाळ, नट्स, सफरचंद, मासे, हिरव्या भाज्या आणि धान्य यांचा आहारात समावेश करा.
आरोग्यदायी सवय :
नियमित व्यायाम करणे, वेळेवर पुरेशी झोप घेणे आणि तंबाखू आणि अल्कोहोलचे प्रमाण कमी करणे हे मेंदूसाठी खूप महत्वाचे आहे.
मानसिक आरोग्याची काळजी घेणे :
तणाव कमी ठेवण्यासाठी ध्यान आणि मेडिटेशन करा. योगासने आणि प्राणायाम देखील मानसिक आरोग्य सुधारण्यास मदत करते.
सोशल आणि कनेक्टेड रहा :
कुटुंब आणि मित्रांसोबत वेळ घालवणे आणि सामाजिक उपक्रमांमध्ये सहभागी होणे देखील मेंदूसाठी फायदेशीर ठरते.
नवीन आव्हानांना सामोरे जा :
नवीन गोष्टी शिकणे, नवीन कौशल्ये आत्मसात करणे आणि नवीन अनुभव घेण्याने मेंदूची क्षमता वाढते.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा
पोलिस उपायुक्त स्मार्तना पाटील यांच्याकडून झोन-2 मधील 3 सराईत गुन्हेगार तडीपार
बनावट कागदपत्रांच्या आधारे सारस्वत बँकेची 27 लाखांची फसवणूक, बिल्डरसह चार जणांविरुद्ध FIR, एकाला अटक
सुरक्षारक्षकांना मारहाण करुन किर्लोस्कर कंपनीच्या आवारातील चंदनाच्या झाडांची चोरी, 7 ते 8 जणांवर FIR
ACB Trap News | 95 हजारांची लाच घेताना शिक्षण संस्थेच्या अध्यक्षासह मुख्याध्यापक,
शिपाई अँन्टी करप्शनच्या जाळ्यात, शैक्षणिक क्षेत्रात प्रचंड खळबळ
Shraddha Kapoor | श्रद्धा कपूरचा हॉट अंदाज; नेटेट टॉपने वेधले सर्वांचे लक्ष
विमानतळ परिसरात दहशत माजवणाऱ्या चिक्या गायकवाड व त्याच्या इतर 2 साथीदारांवर ‘मोक्का’!
पोलिस आयुक्तांकडून आतापर्यंत 52 संघटित गुन्हेगारी टोळयांवर MCOCA