Crime News | स्विमिंग पूलमध्ये महिला पोलिसासोबत अश्लील चाळे करणाऱ्या पोलिस उपाधीक्षकाला अटक

राजस्थान : वृत्तसंस्था –  Crime News | राजस्थानच्या (Rajasthan) अजमेर (Ajmer) जिल्ह्यातील ब्यावर सर्कलमधील पोलीस उपाधीक्षकांचा एका महिला पोलीस कर्मचा-यासोबत स्विमिंग पूलमधील व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. हिरालाल सैनी (Hiralal Saini) असं त्या पोलीस उपधीक्षकांच नाव आहे. याप्रकरणी पोलीस महासंचालक एम. एल. लाठर (DGP M. L. Lathar) यांनी त्या दोघांना तडकाफडकी निलंबित (Suspended) करण्याचा आदेश देखील काढला. तर आता त्या डीएसपी सैनीला उदयपूरमधील एका रिसॉर्टमधून अटक (Arrested) करण्यात आलीय. राजस्थानच्या विशेष ऑपरेशन पथकाने ही कारवाई केलीय.

पोलीस उपाधीक्षक आणि महिला पोलीस शिपाई (DSP and female police constable) एका रिसॉर्टमधील स्विमिंग पूलमध्ये अश्लील वर्तन करतानाचा व्हिडीओ प्रसार माध्यमांत व्हायरल झाला होता. व्हिडिओतील रिसॉर्टची माहिती घेत पोलिसांनी संबंधित रिसॉर्टवर गुरुवारी रात्री उशिरा छापा टाकला आहे. महिला पोलिसाला एक 6 वर्षाचा छोटा मुलगा देखील होता.
त्यामुळे त्यांना अटक करण्यात आली नाही.
या व्हायरल झालेल्या अश्लिल व्हिडीओमुळे पोलीस दलात मोठी खळबळ उडाली.

महिला पोलिस शिपाईच्या पतीने या प्रकारावरुन पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
दरम्यान, या प्रकारावरुन महिला पोलीस शिपाईच्या पती पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी पोहोचला होता.
पण डीएसपीच्या दबावामुळे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करुन घेण्यास नकार दिला गेल्याचा आरोप पतीनं केला आहे.
त्यानंतर संबंधित पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनाही निलंबीत करण्यात आलं आहे.

 

या दरम्यान, सध्या या प्रकरणाची सविस्तर चौकशी केली जात असून व्हिडिओ शूट कुणी केला आणि कुणी व्हायरल केला याचाही शोध घेतला जातोय.
असं विशेष ऑपरेशन पथकाचे पोलिस अधिकारी अशोक राठोड (Ashok Rathod) यांनी सांगितलं.
तर, व्हिडिओमध्ये लहान मुल देखील दिसत असल्यानं राज्य बाल संरक्षण आयोगाच्या अध्यक्षा संगीता बेनिवाल (Sangeeta Beniwal) यांनीही या प्रकरणाची गंभीर दखल घेतलीय.
नागौर पोलिस अधिक्षकांना (Nagaur Superintendent of Police) या प्रकरणाचा 3 दिवसांत अहवाल देण्याचा आदेश संगीता बेनिवाल यांनी दिला.

 

Web Title : Crime News | rajasthan dsp arrested doing obscene act female constable front child swimming pool

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

India vs England 5th test | …म्हणून भारत विरुद्ध इंग्लंड 5 वी कसोटी रद्द; इंग्लंड विजयी घोषित

Ketaki Chitale | केतकी चितळेला ‘त्या’ प्रकरणात ठाणे कोर्टाचा धक्का, न्यायालयानं अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला, जाणून घ्या प्रकरण

Chipi Airport Inauguration | केंद्रीय मंत्री नारायण राणे म्हणाले – ‘मुख्यमंत्री चिपी विमानतळ उद्घाटनाला आले तर…’