Crime News | धक्कादायक | डिलिव्हरी बॉयकडून डॉक्टर महिलेवर बलात्कार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था  ओडिसा (Odisha) येथील अंगुल जिल्ह्यातील धक्कादायक घटना घडली आहे. एका डॉक्टर महिलेच्या घरी फूडची डिलिव्हरी (Food Delivery) करण्यासाठी गेलेल्या डिलिव्हरी बॉयकडून (Delivery Boy) 32 वर्षीय डॉक्टरवर बलात्कार (Rape) केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना मंगळवारी (29 जून) रोजी रात्री घडली आहे. सुकांत बेहरा (वय, 35) असं कृत करणाऱ्या व्यक्तीचे नाव असून तो एका ढाब्याच्या मालकाचा मुलगा (Dhaba Owner’s Son) आहे. याप्रकरणी आरोपीला अटक केली आहे. Crime News | youth arrested for allegedly raping a female doctor

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

याबाबत अधिक माहिती अशी की, पीडित महिला एका आरोग्य केंद्रात (Health Center) काम करते आणि ती आपल्या भावासोबत केंद्राकडून देण्यात आलेल्या एका क्वार्टरमध्ये वास्तव्यास आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, ही घटना घडली तेव्हा ती एकटीच याठिकाणी होती
मंगळवारी पीडितेच्या भावानं तिच्यासाठी एका स्थानिक ढाब्यावरुन जेवण पाठवलं.
तो स्वतःही याच ढाब्यावर बसून जेवत होता. या ढाब्याच्या मालकाचा मुलगा सुकांत रात्री 11 च्या दरम्यान जेवण घेऊन पीडितेच्या घरी आला.
तर डॉक्टर तरुणी ही घरात एकटी असल्याचं बघून तो घरात शिरला.
यानंतर त्याने परिस्थितीचा फायदा घेत डॉक्टर महिलेवर बलात्कार (Rape) केला आहे.

या दरम्यान, या प्रकरणावरून डॉक्टर महिला (बहीण) आणि तिच्या भावाने छेंडीपाडा पोलीस स्टेशनमध्ये (Chhendipada Police Station) फिर्याद दिली आहे.
यावरून संबंधित आरोपीला अटक करण्यात आली असून डॉक्टरांना मेडिकल तपासणीसाठी पाठवण्यात आलं आहे.
या घटनेचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.

Web Title : Crime News | youth arrested for allegedly raping a female doctor

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Gopichand Padalkar Allegations against NCP | राष्ट्रवादी मुद्यावरुन गुद्यावर आली, गोपीचंद पडळकरांची घणाघाती टीका