Crude Oil Prices | कच्च्या तेलाच्या किंमतीत मोठी वाढ; पेट्रोल-डिझेल महागणार?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Crude Oil Prices | सर्वात मोठा तेल निर्यातदार देश असलेल्या सौदी अरेबियाने (Saudi Arabia) जुलै साठी आशियाई देशांना विकावयाच्या कच्च्या तेलाच्या दरात (Crude Oil Prices) अपेक्षेपेक्षा जवळपास दुपटीने वाढ केली आहे. काल (सोमवारी) वायदे बाजारात तेलाचा प्रति पिंप दर उच्चांकी 120 डॉलरवर गेला आहे. भारतीय चलनानुसार (Indian Currency) कच्च्या तेलाच्या किंमतीत 29 रुपयांनी (0.31 टक्के) वाढ झाल्याने प्रतिपिंप दर 9,264 रुपये झाला आहे.

 

खरेदीदाराच्या बोलींमुळे वायदे बाजारात कच्च्या तेलाचा दर वाढला आहे. यामुळे विश्लेषकांचे म्हणणे आहे. ओपेक प्लस या तेलउत्पादक देशांच्या संघटनेने मागील आठवड्यामध्ये तेल उत्पादनाला गती देण्याचा निर्णय घेतला असला तरी तेलाच्या पुरवठय़ाबाबत शंका निर्माण केली आहे. दरम्यान, एका आशियाई तेल व्यापाऱ्याने सांगितले की, अरब लाईटच्या किमतीतील वाढ अगदीच अनपेक्षित असून आम्ही चक्रावलो आहोत.

या दरम्यान, वाढीच्या मूळ वेळापत्रकात रशियाला (Russia) देखील गृहीत धरण्यात आले होते.
त्याचबरोबर अँगोला आणि नायजेरिया यांसारखे देश आपले उद्दीष्ट गाठण्यासाठी संघर्ष करीत आहेत.
त्यामुळे प्रत्यक्ष उत्पादन वाढ कमी होऊन तेलाची टंचाई निर्माण होऊ शकते. असं सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.
दरम्यान कच्च्या तेलाच्या किमतीत अपेक्षेपेक्षा जवळपास दुपटीने वाढ केली आहे.
हा परिणाम पाहता पेट्रोल-डिझेलच्या दरात (Petrol Diesel Rates) वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

 

Web Title :- Crude Oil Prices | crude oil prices hike

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा