‘CSK ISquash Trophy’ 2023 Open National Championship Squash Tournament | ‘सीएसके आयस्क्वॉश करंडक’ २०२३ खुल्या राष्ट्रीय अजिंक्यपद स्क्वॉश स्पर्धेचे १५ सप्टेंबर पासून आयोजन

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – ‘CSK ISquash Trophy’ 2023 Open National Championship Squash Tournament | आयस्क्वॉश अ‍ॅकॅडमी तर्फे ‘सीएसके आयस्क्वॉश करंडक’ २०२३ खुल्या राष्ट्रीय अजिंक्यपद स्क्वॉश स्पर्धेचे (‘CSK ISquash Trophy’ 2023 Open National Championship Squash Tournament) आयोजन करण्यात आले आहे. ही २-स्टार स्क्वॉश रॅकेट फेडरेशन ऑफ इंडिया (एसआरएफआय) राष्ट्रीय स्पर्धा १५, १६ आणि १७ सप्टेंबर २०३ या कालावधीमध्ये चंचला संदीप कोद्रे (सीएसके) स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, मुंढवा येथे होणार आहे. स्पर्धेमध्ये भारतातील ८ राज्यांतील सुमारे १८० खेळाडूंनी आपला सहभाग नोंदविला आहे.

या स्पर्धेबाबत अधिक माहिती देताना आयस्क्वॉश अ‍ॅकॅडमीचे संचालक मनिषा जिल्का आणि असिफ सय्यद आणि सहसंचालक रोहीत मोरे यांनी सांगितले की, या वर्षीसुद्धा स्क्वॅश रॅकेट्स फेडरेशन ऑफ इंडियाची (एसआरएफआय) २-स्टार अशी मानांकित राष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन करण्याचा मान आम्हाला मिळत आहे, ही फार अभिमानाची गोष्ट आहे. चंचला संदीप कोद्रे (सीएसके) स्पोर्ट्सचे संचालक संदीपदादा कोद्रे हे या स्पर्धेचे मुख्य आधारस्तंभ असून त्यांच्या पाठींब्यामूळे या स्पर्धेचे आयोजन करणे शक्य होत आहे. स्पर्धेला टर्नअराऊंड इंटनॅशनल क्लिनिकचे माईक टर्नर, डॉ. पुजा लोढा, ईगल स्केल्स् आणि मंकी आईस यांनी पाठींबा दिला आहे.

या स्पर्धेत देशातील ज्युनिअर गटातील खेळाडूंनी आपला सहभाग नोंदविला आहे. महाराष्ट्रासह मध्यप्रदेश, गुजरात, राजस्थान, चैन्नई, कर्नाटक, गोवा अशा ८ राज्यांमधील सुमारे १८० खेळाडू सहभागी झाले आहेत. ही स्पर्धा मुले आणि मुली ९, ११, १३, १५, १७ आणि १९ वर्षाखालील ज्युनिअर गट अशा विविध गटांमध्ये खेळावण्यात येणार आहे. स्पर्धेत एकेरी गटात सामने होणार असून हे सामने बाद फेरी पध्दतीने खेळविण्यात येणार आहेत. स्पर्धेतील सर्व गटातील पहिल्या ८ विजेत्यांना करंडक आणि मेडल्स् देण्यात येणार आहेत.

असिफ सय्यद आणि मनिषा जिल्का यांनी पुढे सांगितले की, ही राष्ट्रीय स्पर्धा पुण्यामध्ये आयोजित केल्यामुळे
स्थानिक खेळाडूंना स्पर्धेमध्ये भाग घेण्याची सहज संधी उपलब्ध झाली आहे. महाराष्ट्र राज्यातून ७० असे सर्वाधिक
खेळाडूंनी सहभाग नोंदविलेला आहे. ही स्पर्धा स्क्वॅश रॅकेट्स फेडरेशन ऑफ इंडिया आणि महाराष्ट्र स्क्वॅश रॅकेट्स
असोसिएशन यांच्यामान्यतेखाली आयोजित केली जात आहे. आयस्क्वॅश अ‍ॅकॅडमीमध्ये संपूर्ण ग्लास स्क्वॅश कोर्ट
उपलब्ध असून असे कोर्ट पुण्यासह देशामध्ये केवळ चैन्नई आणि मध्यप्रदेश येथेच उपलब्ध आहेत. स्पर्धेचे सामने आयस्क्वॅश अ‍ॅकॅडमीच्या ३ ग्लास बॅक एएसबी स्क्वॅश कोर्ट आणि एक संपूर्ण ग्लास स्क्वॅश कोर्टमध्ये खेळविण्यात येणार आहे. (‘CSK ISquash Trophy’ 2023 Open National Championship Squash Tournament)

१३ वर्षाखालील मुलांच्या ज्युनिअर गटामध्ये आयस्क्वॅश अ‍ॅकॅडमीच्या स्वरीत पाटील याला अग्रमानांकन देण्यात आले आहे.
स्वरीत याने जून २०२३ मध्ये चीनमध्ये झालेल्या १३ वर्षाखालील आशियायी ज्युनिअर स्पर्धेत भारतीय संघाचे
प्रतिनिधीत्व केले होते. यामध्ये मुलींच्या गटात आयस्क्वॅश अ‍ॅकॅडमीच्या आरीका मिश्रा यांना अग्रमानांकन मिळाले आहे.
आरीका मिश्रा हिने २०२२ मध्ये थायलंडमध्ये झालेल्या एशियन ज्युनिअर स्क्वॅश स्पर्धेमध्ये भारताचे प्रतिनिधीत्व केले होते.

१५ वर्षाखालील गटात इशा श्रीवास्तवा या आयस्क्वॅश अ‍ॅकॅडमीच्या खेळाडूला अग्रमानांकन आहे. ९ वर्षाखालील गटात
आरव कोथापल्ली याला मुलांचे तर, मुलींमध्ये रिशीमा माहूरकर, ११ वर्षाखालील गटात शनया रॉय मुलींमध्ये तर,
मुलांमध्ये क्रिशीव्ह मित्तल; १३ वर्षाखालील गटात वसुंधरा नानगरे यांना अग्रमानांकन आहे.
१५ वर्षाखालील गटामध्ये रिधान शहा याला, १७ वर्षाखालील गटात आकाश कन्नन याला आणि १९ वर्षाखालील
गटात मय्यमपन याला अग्रमानांकन देण्यात आले आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Vijay Wadettiwar | विजय वडेट्टीवार यांची मुख्यमंत्र्यांवर खोचक टीका; म्हणाले, “ बघू मराठा आरक्षण देतात की निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा लोकांच्या तोंडाला पाने पुसतात”