Cursed Movie | हॉलीवूडचा ‘हा’ चित्रपट आहे शापित ; स्क्रिप्ट तयार असून देखील चित्रपट कधीच बनला नाही

पोलीसनामा ऑनलाईन : Cursed Movie | हॉलीवुड (Hollywood) मध्ये अनेक सत्य घटनांवर आधारित हॉरर फिल्म (Horror Movies) अनेकदा प्रसिद्ध झाल्या आहेत. असे चित्रपट प्रेक्षकांच्या आजही लक्षात आहेत. मात्र हॉलीवूडचा एक असा चित्रपट देखील आहे जो बनण्याच्या आधीच रहस्यमय चर्चेत अडकला आहे. ‘अटूक’ (Atuk) असे या हॉलीवुड चित्रपटाचे नाव आहे. जो कोणी या चित्रपटाचे स्क्रिप्ट वाचले आहे त्यांचा मृत्यू झाला आहे म्हणून याला शापित स्क्रिप्ट (Cursed Movie) म्हणून जाहीर करण्यात आले.

ही गोष्ट अगदी धक्कादायक असली न विश्वास बसणारी असली तरी तितकीच खरी आहे. या चित्रपटात नायकाची भूमिका करण्यासाठी ज्यांनी ज्यांनी ही स्क्रिप्ट वाचली त्यांचा मृत्यू झाला आहे. हॉलीवुडने या चित्रपटाची स्क्रिप्ट वाचणाऱ्यांच्या मृत्यूची मालिका पाहिली आहे. चित्रपटाची कथा अशी आहे कि, एक मुलगा अलास्कामध्ये एका मुलीच्या प्रेमात पडतो आणि तिच्या पाठोपाठ न्यूयॉर्क मध्ये येतो. हा मुलगा मुलीच्या इतक्या प्रेमात पडतो की तो त्याचे सर्वस्व गमावून बसतो. या कथेवर आधारित कादंबरी देखील लिहिली गेली. यानंतर नॉर्मन ज्यूसन (Norman Jewson) या दिग्दर्शकांनी याची पटकथा लिहिण्यास टॉड कॅरोल यांना सांगितले. तब्बल दोन वर्षानंतर या चित्रपटाची स्क्रिप्ट लिहून पूर्ण झाली. कॉमेडियन अभिनेता जॉन बेलुशीचा (Actor John Belushi) स्क्रिप्ट वाचल्यानंतर एका हॉटेलमध्ये मृत्यू झाला.ड्रग्सच्या अतिसेवनाने त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले होते. (Cursed Movie)

या स्क्रिप्टमुळे आतापर्यंत तब्बल सहा लोकांचा मृत्यू झाला (6 Actors Died).
यामध्ये कॉमेडियन अभिनेता सॅम किनिसनचा (Sam Kinnison) अपघातात मृत्यू झाला.
तर जॉन कॅंडीचा (John Candy) हॉटेलमध्ये संशयास्पद मृत्यू झाला.
ख्रिस फार्ले (Chris Farley) आणि जॉन हार्टमन (John Hartman) या दोघांचे मृत्यू देखील
अटूकची स्क्रिप्ट वाचल्यामुळे झाल्याचे समोर आले.एवढेच नाही तर स्क्रिप्ट देणारी व्यक्ती मायकल
ओ’डोनोघ्यू (Michael O’Donoghue) देखील मृत्यूच्या कचाट्यात अडकले.
या सर्व घटनाानंतर चित्रपटाच्या निर्माता दिग्दर्शकांनी या स्क्रिप्टला शापित स्क्रिप्ट जाहीर करून प्रोजेक्ट
कायमचे बंद केले आणि ही स्क्रिप्ट लपवून ठेवण्यात आली.

Web Title :-  Cursed Movie | atuk movie is known as cursed movie as 6 actors died after reading script

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Har Har Mahadev | ‘हर हर महादेव’ चित्रपटाला राष्ट्रवादीचा विरोध, प्रेक्षकाला मारहाण केल्या प्रकरणी जितेंद्र आव्हाड यांच्यासह 100 कार्यकर्त्यांवर FIR