Har Har Mahadev | ‘हर हर महादेव’ चित्रपटाला राष्ट्रवादीचा विरोध, प्रेक्षकाला मारहाण केल्या प्रकरणी जितेंद्र आव्हाड यांच्यासह 100 कार्यकर्त्यांवर FIR

ठाणे : पोलीसनामा ऑनलाइन – माजी खासदार संभाजीराजे छत्रपती (Former MP Sambhajiraje Chhatrapati) यांनी ‘हर हर महादेव’ (Har Har Mahadev) आणि ‘वेडात मराठे वीर दौडला सात’ (Vedat Marathe Veer Daudale Saat) या मराठी चित्रपटांना विरोध केल्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड (NCP MLA Jitendra Awad) हे देखील आक्रमक झाले आहेत. या चित्रटांमध्ये शिवाजी महाराज यांच्या इतिहासाची मोडतोड केल्याचा दावा त्यांनी केला आहे. याच कारणामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी ठाणे जिल्ह्यातील एका मॉलमधील ‘हर हर महादेव’ (Har Har Mahadev) या चित्रपटाचा शो बंद पाडला. याप्रकरणी जितेंद्र आव्हाड यांच्यासह 100 कार्यकर्त्यां विरोधात वर्तकनगर पोलीस ठाण्यात (Vartaknagar Police Station) वेगवेगळ्या कलमांतर्गत गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.

‘हर हर महादेव’ (Har Har Mahadev) या चित्रपटाला विरोध म्हणून जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीच्या काही कार्यकर्त्यांनी सोमवार रात्री 11 वाजता ठाण्यात आंदोलन केले. यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी प्रेक्षकांना सिनेमागृहाच्या बाहेर जाण्याचे आवाहन केले. यानंतरही सिनेमागृहात बसलेल्या प्रेक्षकांना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी हुसकावून लावल्याने किरकोळ वादाचे प्रसंग घडले. याच कारणामुळे वर्तकनगर पोलीस ठाण्यात आयपीसी 141,143,146,149,323,504 या कलमांतर्गत आव्हाड यांच्यासह 100 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला आहे.

‘हर हर महादेव’ हा छत्रपती शिवाजी महाराजांवरील (Chhatrapati Shivaji Maharaj) आधारित
चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शीत झाला आहे. मात्र या चित्रपटाला आता विरोध केला जात आहे.
ठाण्यात राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी विवियाना मॉलमध्ये (Viviana Mall) जाऊन आंदोलन करुन
शो बंद पाडला. यावेळी एका प्रेक्षकाने तिकिटाचे पैसे परत द्या आम्ही आमचा वेळ वाया घालवला आहे का,
अशा शब्दात मॉल चालकाला सुनावले. यावेळी प्रेक्षकाची समजूत काढण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केला.
मात्र, संतप्त झालेल्या प्रेक्षकाने त्यांचे ऐकले नाही. अखेर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी या प्रेक्षकाला मारहाण
(Beating) केल्याची घटना घडली. याचा व्हिडिओ मनसे नेते अमेय खोपकर ( MNS Ameya Khopkar)
यांनी ट्विट केला आहे.

Web Title :-  Har Har Mahadev | case filed against ncp mla jitendra awhad and his workers thane closing har har mahadev film show

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

You Must Die | ‘अ परफेक्ट मर्डर’ च्या खेळात प्रेक्षकांना गुंतवून टाकण्यासाठी सौरभ गोखले सज्ज

Pune Crime | बांधकाम व्यावसायिक काकडे यांच्यावर अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल, काकडेंनी दाखल केला त्याच्यावर खंडणीचा गुन्हा

Kantara Box Office Collection | ‘कांतारा’ चित्रपटाने बाहुबली -2 नंतर मोडला ‘या’ जादुई चित्रपटाचा रेकॉर्ड