2800 रुपयांचे जेवण ऑर्डर केले आणि 12 लाख रु. टिप दिली, वेटरने सांगितली ‘त्या’ मिस्ट्री मॅनची पूर्ण कथा

नवी दिल्ली : वृत्त संस्था – customer | एका ग्राहकाने सुमारे 2800 रुपयांचे जेवण ऑर्डर केले…वेटर ऑर्डर घेऊन आला…ग्राहकांने जेवण खाल्ले आणि बिलसोबत सुमारे 12 लाख रुपयांची टिप दिली (customer) . ही घटना अमेरिकेच्या न्यू इंग्लंडच्या न्यू हॅम्पशायरची आहे. customer in new hampshire ate food worth rs 2800 and gave a tip of rs 12 lakh

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

एनबीसी न्यूजनुसार, कस्टमरची ओळख पटली नाही. घटना 12 जूनची आहे. कस्टमरने लंडन डेअरीच्या स्टम्बल इन बार अँड ग्रिलमध्ये दोन चिली डॉग, फ्राइड चिप्स आणि काही कॉकटेलची ऑर्डर दिली होती. बारटेंडरने सांगितले की, तो एक मिस्ट्री मॅन होता. मी मोठ्या कालावधीपासून काम करत आहे, परंतु मी कधी विचार केला नव्हता की, माझ्याबाबतीत असे काही घडू शकते.

विश्वासच बसला नाही
रेस्टॉरंटचे मालक माईक जरेला यांनी म्हटले की, त्यांना तर सुरूवातीला विश्वास बसला नाही. त्यांना वाटले की, त्यांनी रिसिट चुकीच्या पद्धतीने वाचली आहे. मला वाटले की, टाईप करताना चुक झाली असेल. परंतु, जेव्हा माझ्या स्टाफने सांगितले की ही मस्करी नाही सत्य आहे. तेव्हा माझा विश्वास बसला.

रात्रीच्या वेळी रेस्टॉरंटमध्ये जेवढे स्टाफ मेंबर होते, सर्वांनी टिप समान वाटून घेतली.
बारटेंडरने म्हटले, स्टाफचा प्रत्येक मेंबर त्या ग्राहकाच्या दयेसाठी आभारी होता.
त्या ग्राहकाने अशावेळी दया दाखवली जेव्हा कोरोना महामारीमुळे एका वर्षात 110,000 पेक्षा जास्त रेस्टॉरंट आणि बार बंद करावे लागले आहेत.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

 

Web Titel : customer in new hampshire ate food worth rs 2800 and gave a tip of rs 12 lakh

 

हे देखील वाचा

Paranjape Builders Arrested | प्रसिध्द बिल्डर परांजपे बंधूंवर मुंबई पोलिसांची मोठी कारवाई; पुण्यातील राहत्या घरातून केली अटक

पुण्यातील व्यापार्‍याने 130 कोटींची बनावट बिले, कंपन्या स्थापन करून बुडवला कोट्यवधीचा GST