Dabangg 3 Movie | “दबंग 3 च्या सेटवर मला कुत्र्यासारखी वागणुक द्यायचे”, चित्रपटातील अभिनेत्रीचा सलमान खान आणि त्याच्या बॉडीगार्डवर आरोप

पोलीसनामा ऑनलाइन – Dabangg 3 Movie | बॉलीवुडचा (Bollywood) सुपरस्टार सलमान खानची (Salman Khan) पॉप्युलॅरिटी ही जगभरात आहे. त्याचे चाहते त्याच्या सोबत एक फोटो काढण्यासाठी जीवाची धडपड करत असतात. पण फक्त चाहतेच नाही तर त्याच्या चित्रपटात काम करणाऱ्या अभिनेत्रींनाही त्याला भेटण्यासाठी 100 लोकांना विनवण्या कराव्या लागतात. अभिनेत्रींना सेटवर कुत्र्यासारखी वागणूक दिली जाते असा घणाघात दबंग 3 मधील अभिनेत्रीने केला आहे. (Dabangg 3 Movie)

अभिनेता सलमान खानचे सिनेमे बॉक्स ऑफिसवर गाजत असतात. त्याचे प्रत्येक सिनेमे चाहते अक्षरश: डोक्यावर घेतात. त्यापैकीच एक हिट चित्रपट म्हणजे दबंग (Dabangg). भाईजानचा दबंग चित्रपट खूप गाजल्यामुळे दबंग 2 आणि दबंग 3 देखील काढण्यात आला. मात्र दबंग 3 (Dabangg 3) चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. त्याचे कारण म्हणजे दबंग 3 चित्रपटातील अभिनेत्री हेमा शर्मा (Actress Hema Sharma) हिने सलमान खान विषयी धक्कादायक खुलासे केले आहेत. तिने त्याच्या बॉडीगार्डवरही आरोप केले आहेत. (Hema Sharma Allegation)

एका मुलाखती दरम्यान अभिनेत्री हेमाने तिच्या सोबत घडलेला प्रसंग सांगितला आहे. ती म्हणाली की, “दबंग 3च्या सेटवर मला कुत्र्यासारखी वागणुक दिली जात होती. मला या चित्रपटात काम करायचे होते आणि त्यासाठी मी माझ्या क्षमतेनुसार मी सगळं काही केलं होतं. कारण, मला सलमान खानला भेटायचं होतं. माझा पहिला सीन सलमान सरांसोबत होता. त्यामुळे मी खूप आनंदात होते. परंतु, ज्या सीनमध्ये मी होते ते सीन सलमान सरांशिवाय शूट करण्यात आले. शूट संपल्यानंतर मला सलमान सरांना भेटायचं होतं. त्यासाठी मी त्यांच्याशी संबंधित अनेक लोकांना भेटले सुद्धा”, अस हेमा म्हणाली.

पुढे ती म्हणते, “सलमान खानसोबत एक फोटो काढण्यासाठी मी जवळपास 50 लोकांना भेटले असेन.
त्यावेळी मी पंडित जनार्दन यांना भेटले आणि माझी इच्छा सांगितली.
त्यांनीही सलमानसोबत भेट घडवून देण्याचे आश्वासन दिलं. पण, सेटवर मला इतकं वाईट वागणूक दिली.
पदोपदी माझा जो अपमान केला तो मी सांगू शकत नाही. सलमानच्या सुरक्षा रक्षकांनी मला कुत्र्यासारखं बाहेर फेकून देले. 100 पेक्षा जास्त लोकांनी माझा अपमान केला. यात मला काही ओळखणारे लोक होते. या घटनेमुळे मला मानसिक त्रास झाला आणि पुढचे दहा दिवस मी झोपू शकले नाही.

अभिनेत्री हेमा शर्मा हिने केलेल्या या धक्कादायक खुलासामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
अनेकांनी हेमा सोबत घडलेला प्रकार निंदनीय असल्याच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
हेमाचा मुलाखतीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
या प्रकरणावर अभिनेता सलमान खान (Salman Khan) काय प्रतिक्रिया देणार याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

Web Title : Dabangg 3 Movie | i was treated like a dog on the sets of dabangg 3 the actress accused the bodyguard along with salman

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा