Data Hack By Android Apps | अँड्रॉइड फोन वापरकर्त्यांचा डेटा होतोय चोरी; ‘हे’ ॲप्स लगेचच करा डिलीट

पोलीसनामा ऑनलाइन – Data Hack By Android Apps | अँड्रॉइड फोन वापरकर्त्यांच्या (Android User) सुरक्षिततेसाठी एक महत्त्वपूर्ण माहिती समोर येत आहे. काही ठराविक ॲप्स अँड्रॉइड वापरकर्त्यांचा प्राव्हेट डेटा हॅक (Private Data Hack) करत असल्याची धक्कादायक बाब समोर येत आहे. प्ले स्टोरवर हे ॲप्स सहज उपलब्ध होत असल्याने अनेक अँड्रॉइड फोन वापरकर्त्यांनी ते डाऊनलोड केले आहेत. या ॲप्समध्ये व्हायरस आढळल्याने आता गुगलतर्फे (Google) हे ॲप्स हटवण्यात आले आहेत. मात्र आधी इंन्स्टॉल केलेल्या वापरकर्त्यांना हे ठराविक ॲप्स डिलीट करण्याच्या सूचना देण्यात येत आहे. Dr. Web या सिक्योरिटी रिसर्चर्स कडूनही याबाबतची सूचना देण्यात आली असून, सुरक्षिततेसाठी हे ॲप्स त्वरीत फोनमधून डिलीट करण्यास सांगितलं आहे. (Data Hack By Android Apps)

गोपनियतेचा भंग करणाऱ्या ॲप्समध्ये (SpinOK) हा स्पायवेअर मॉड्युल असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे सुरक्षिततेसाठी त्यांना गुगल प्ले स्टोअरमधून (Google Play Store) डिलीट करण्यात आले आहे. या स्मायवेअरद्वारे ज्या देखील फोनमध्ये संबधित अॅप्स इन्स्टॉल आहेत, त्या फोनमधील खाजगी डेटा चोरला जाऊ शकतो. तसंच त्या युजरची ॲक्टिव्हिटी देखील ट्रॅक केली जाऊ शकते. धक्कादायक बाब म्हणजे या धोकादायक अॅप्सला जवळपास 42 कोटी लोकांनी डाऊनलोड केले आहे.

याआधी भारत सरकारतर्फे (Indian Government) धोकदायक अ‍ॅप्सच्या नावांची पूर्ण यादी प्रसिद्ध करण्यात आली होती. आणि ती अ‍ॅप्स प्ले स्टोअर वरुन डिलीट देखील करण्यात आले होते. (Dangerous App) लोकांना हे अॅप्स फोनमधून डिलीट करण्याचे आवाहन करण्यात आले होते. तसेच स्पायवेअर असलेले हे अ‍ॅप्स गुगलने हटवले असून त्यांची नावे जाहीर केली आहेत. (Data Hack By Android Apps)

स्पायवेअर असलेल्या अ‍ॅप्सची नावे खालीलप्रमाणे –

1 Noizz – video Editor With Music
2 Zapya – File Transfer, Share

3 VFly – Video Editor and Video Maker

4 MVBit – MV video status maker

5 Biugo – video Maker and Video Editor

6 Crazy Drop

7 Cashzine – Earn Money Reward

8 Fizzo – Novel-Reading offline

Web Title :   Data Hack By Android Apps | delete these apps from your android phone google gave warning

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

NCP MP Supriya Sule | ‘दादालाही वेलविशर शोधायला सांगितलंय’, शिंदेंच्या जाहिरातीवरून सुप्रिया सुळेंचा टोला (VIDEO)

Pune PMPML Administration | पीएमपीएमएलकडून स्वारगेट आणि मार्केटयार्ड परिसरातून मुळशी तालुक्यात जाणारे 11 मार्ग पुन्हा सुरू

Maharashtra Politics News | दादा, आमच्यासोबत या, शिंदे गटाच्या मंत्र्याची अजित पवारांना खुली ऑफर