NCP MP Supriya Sule | ‘दादालाही वेलविशर शोधायला सांगितलंय’, शिंदेंच्या जाहिरातीवरून सुप्रिया सुळेंचा टोला (VIDEO)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – अजित पवार (Ajit Pawar) आणि मी शिंदे सरकारच्या जाहिराती (Shinde Government Advertisement) देणाऱ्या सारखा वेलविशर्स (Wellwisher) शोधतोय. तो मिळाला तर आमच्यासाठी विनविन परिस्थिती असेल, असा टोला राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (NCP MP Supriya Sule) यांनी लगावला. सत्तेत असलेले नेते जर जाहिरात आणि बॅनरबाजी करत असतील तर राज्याचे काम कुठे चाललेय ते दिसते. कारण हे एकमेकांना कमी लेखण्यातच व्यस्त आहेत, अशी टीकाही सुप्रिया सुळे (NCP MP Supriya Sule) यांनी केली. आज त्यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेत माध्यमांशी संवाद सधला.

शिंदे गटाच्या (Shinde Group) कथित वेलविशरकडून काही दिवसांपूर्वी सलग दोन दिवस मुख्यमंत्र्यांच्या लोकप्रियतेचा पाढा वाचणाऱ्या जाहिराती प्रसिद्ध झाल्या होत्या. या जाहिरातीवरुन वादळ उठल्यानंतर या जाहिराती आमच्या हितचिंतकाने दिल्याची माहिती शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी दिली होती. यावर सुप्रिया सुळे (NCP MP Supriya Sule) यांनी पत्रकार परिषदेत बोलताना टोला लगावला आहे.

दादालाही वेलविशर शोधायला सांगितले

सुप्रिया सुळे म्हणाल्या, या जाहिरातीचे वेलविशर कोण आहेत, याचा आम्ही शोध घेत आहोत.
दादालाही मी याचा शोध घ्यायला सांगितले आहे. दादा आता जळगावला गेला आहे, तिथे त्याला सांगितलं बघ
तिकडे तरी आहे का वेलविशर. मी काल पुण्यात होते. तिथेही शोधला. आज बऱ्याच दिवसांनी मुंबईत आलेय.
आजची मिटिंग झाली की हा वेलविशर कोण आहे ते शोधणार आहे. असे वेलविशर आपल्या पक्षालाही मिळाले पाहिजेत.
माध्यमांना फूल पेज जाहिराती मिळाल्या तर तुमचं आणि आमचं दोघांचंही भलं होईल.
असे वेलविशर कोण असतील तर त्यांना माझा, जयंत पाटील (Jayant Patil) किंवा अजित दादांचा नंबर द्या,
अशी मिश्किल टिप्पणी सुप्रिया सुळे यांनी केली.

Web Title :   NCP MP Supriya Sule | supriya sule lashes out at government in mumbai women abuse case said home department of maharashtra

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

IAS Dr. Anil Ramod Suspension | लाचखोर आयएएस डॉ. अनिल रामोडवर लवकर निलंबन कारवाई

CM Eknath Shinde | “साखर कारखान्यासाठी 25 किमीची अट शिथिल करण्यासाठी समिती नेमणार”

Maharashtra Weather Update | पुणे, मुंबईसह ‘या’ भागात पावसाचा इशारा: हवामाना खात्याचा अंदाज