सहकारी संस्थांना लेखा परिक्षण अहवाल सादर करण्यासाठी ‘या’ तारखेपर्यंत मुदत

पोलीसनामा ऑनलाईन, मुंबई, दि. 20 डिसेंबर : सहकारी संस्थेचे 2019-20 या कालावधीचे लेखापरीक्षण अहवाल दाखल करण्यासाठी सर्व सहकारी सस्थांना महाराष्ट्र शासनाने 31 डिसेंबर 2020 पर्यंत मुदतवाढ दिलीय.

तसेच 2019-20 या आर्थिक वर्षाची सर्वसाधारण सभा घेण्यासाठी 31 मार्च 2021 पर्यंत मुदतवाढ दिलीय. संस्थांनी महापालिका, पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे बैठक घ्यावी. यासाठी या कार्यालयातील परवानगी घेण्याची गरजेचे नाही.

जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, पूर्व उपनगरे यांच्या कार्यालयांतर्गत घाटकोपर, कुर्ला, चुनाभटटी, चेंबूर, गोवंडी, मानखुर्द, भांडूप, कांजुरमार्ग, विक्रोळी, पवईसह मुलुंड हे 5 विभाग येतात. या पाच विभागात येणा-या सर्व संस्थांना या सूचना दिल्या आहेत.

सहकारी गृहनिर्माण संस्थांना संस्था नोंदणीनंतर 4 महिन्यांच्या आत जमिनीचे मानिव अभिहस्तांतरण करणे गरजेचे आहे.

जागामालक, विकासकाकडून सहकार्य मिळाले नाही तर संस्थांना कायद्यान्वये सक्षम प्राधिकृत अधिकारी म्हणून जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्थेकडे अभिहस्तांतरणासाठी आवश्यक ती कागदपत्रे सादर करता येणार आहेत.

शिल्लक चटई, पुनर्विकास व क्षेत्रवापरासाठी संस्थेच्या नावे जमीन असणे गरजेचे आहे. या करीता उपनगरातील संस्थांनी याबाबत या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.