धक्कादायक ! एका रात्रीसाठी साडेचार लाखांत 16 वर्षाच्या भाचीला विकलं, 37 वर्षीय पूर्वाश्रमीची बारबाला ‘गोत्यात’

मीरा रोड / वसई : पोलीसनामा ऑनलाइन – Crime | एका 37 वर्षीय महिलेने आपल्या 16 वर्षांच्या सख्ख्या भाचीचा (Niece) एका रात्रीसाठी (For a night) साडेचार लाख रुपयांचा (deal for 4.5 lakhs) सौदा केल्याची धक्कादायक घटना मीरा रोड (Meera Road) येथून समोर आली आहे. पण पोलिसांच्या सतर्कतेमुळे हा सौदा फसला अन् आरोपी महिलेला पोलिसांनी रंगेहाथ अटक केली. दरम्यान पोलिसांनी 16 वर्षीय पीडित मुलीची सुखरुप सुटका केली आहे. आरोपी महिला पूर्वाश्रमीची बारबाला असल्याची माहिती पोलीस चौकशीतून समोर आली आहे.
Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update
प्राप्त माहितीनुसार, मीरा रोड येथे राहणारी एक महिला आपल्या 16 वर्षीय मुलीला वेश्याव्यवसायासाठी (Minor girl in Prostitution) घेऊन येणार आहे. तसेच तसेच पीडीत मुलीचा एका रात्रीसाठी साडेचार लाखांत सौदा केल्याची माहिती बेकायदेशीर मानवी तस्करी शाखेला मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी तातडीने एका स्वयंसेवी महिलेच्या मदतीने आरोपी महिलेशी संपर्क साधला.
तसेच पोलिसांनी बनावट ग्राहकही तयार केले.
मुंबई-अहमदाबाद येथील एका हॉटेलमध्ये हा व्यवहार ठरला.
यानंतर आरोपी महिला अल्पवयीन मुलीला ठरलेल्या ठिकाणी घेऊन आली.
या ठिकाणी आधीपासून सापळा रचलेल्या पोलिसांनी आरोपी महिलेला रंगेहाथ अटक केली. तसेच पोलिसांनी पीडित मुलीची सुटका केली आहे. या घटनेचा तपास पोलीस करत आहेत.
Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update
Web Titel : deal for one night former bar dancer arrested for selling 16 year old niece to four and half lakhs
Pune Crime News | मोक्क्यातील सराईत गुन्हेगार विवेक शेवाळे गजाआड