‘कोरोना’ महामारी आणि लसीकरणाच्या संबंधीत माहितीसाठी सरकारने बनवले कॉल सेंटर, जारी झाला हेल्पलाइन नंबर

नवी दिल्ली : कोविड-19 च्याविरूद्ध देशभरात 16 जानेवारीपासून लसीकरणाला सुरूवात होत आहे. याबाबत व्यापक स्तरावर तयारी करण्यात आली आहे आणि सर्वप्रथम फ्रंट लाइन वर्करला लस दिली जाणार आहे. दरम्यान, कोरोना व्हायरस महामारी आणि व्हॅक्सीनेशनबाबत 24 तास सात दिवस काम करणारे कॉल सेंटर बनवण्यात आले आहे.

पंतप्रधान कार्यालयाकडून सांगण्यात आले की, 24 तास काम करण्यार्‍या कॉल सेंटरची स्थापना करण्यात आली, जेणेकरून कोविड महामारी आणि लसीकरणाबाबत माहिती घेता येईल. हा नंबर आहे – 1075.

 

 

 

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडिओ कॉन्फ्रन्सिंगच्या माध्यमातून 16 जानेवारीला कोरोना लसीकरण अभियानाचा संपूर्ण भारतात शुभारंभ करणार आहेत. हा जगातील सर्वात मोठा लसीकरण कार्यक्रम असेल जो संपूर्ण देश कव्हर करेल. लाँचच्या दरम्यान सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधील एकुण 3006 लसीकरण केंद्र जोडली जातील. उद्घाटनाच्या दिवशी प्रत्येक सेंटरवर 100 लाभार्थ्यांना लस दिली जाईल.

हा लसीकारण कार्यक्रम आरोग्य सेवेशी संबंधीत फ्रंट लाइन वर्करला लस देण्यासाठी होईल, हा कार्यक्रम सरकारी आणि खासगी दोन्ही क्षेत्रातील फ्रंट लाइन वर्कर्सला लस देण्यासाठी विशेष करून चालवला जाईल.

लसीकरण कार्यक्रमात को-विनचा वापर केला जाईल, जो केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाद्वारे विकसित एक ऑनलाइन डिजिटल प्लॅटफॉर्म आहे, जो लसीचा साठा, तापमान आणि कोरोना व्हॅक्सीनसाठी लाभार्थ्यांच्या व्यक्तीगत ट्रॅकिंगची प्रत्यक्ष वेळेची माहिती देईल. हा डिजिटल प्लॅटफॉर्म लसीकरण सत्रांचे संचालन करत सर्व स्तरांवर कार्यक्रमाच्या व्यवस्थापकांना मदत करेल.